ब्रेकिंग न्यूज… — करंभाड शिवार जिनिंग जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत आटो चालकाचा घटना स्थळी मृत्यू तर पत्नी गंभीर जख्मी…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी:-पोलीस स्टेशन पारशिवनी अंतगत मौजा करंभाड शिवार जिनिंग जवळ पारशिवनी ते सावनेर रोडवर अज्ञात वाहनाने आटोला जबरदस्त धडक दिल्याने आटोचालकाचा घटनास्थळावर मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

        पोलिस सुत्रा व्दारे मिळालेल्या माहीती नुसार हकीकत अशा प्रकारे आहे की,यातिल मृतक नामे चंद्रशेखर नागोजी तरारे वय 43 वर्षे रा. पारशिवनी व त्याची पत्नी जखमी नामे सौ.गिता चंद्रशेखर तरार हे करंभाड शिवार जिनिंग जवळ पारशिवनी ते सावनेर रोड 04 कि.मी. पश्चिम या ठिकाणी यांचा ऑटो क्र. MH-31- BB-2274 नला खापा येथून पारशिवनी कडे येत असतांना सामोरुन येणा-या अज्ञात वाहन चालकाने भरधाव वेगाने त्यांच्या ऑटोला समोरुन धडक मारल्याने आटो चालक चन्द्रशेखर नागोजी तरारे हा अपघतात जागीच मृत्यु झाला असुन त्याची पत्नी सौ.गिता चन्द्रशेखर तरारे ही आँटोच्या अपघातात जखमी झाली आहे.

       फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट व पो.नि.रविकुमार थोरात यांचे आदेशाने पोलिसांनी अपराध क्रमांक 126/2024 अन्वये कलम 279, 337, 304 (अ) भा.दं. वि. सहकलम 134, 184 मो.वा.का.गुन्हा नोंद करुन तपासात घेतला असून गुन्हाचे पुढील तपास पो.उप.नि.बांबोडे मॅडम पो.स्टे. पारशिवनी हे पुढील करीत आहेत.