ब्रेकिंग न्यूज… — अंजनगाव सुर्जी येथे घरगुती सिलेंडरचा भीषण अपघात… — लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी…

युवराज डोंगरे/खल्लार

          उपसंपादक

          अंजनगाव सुर्जी शहरातील बुधवारा येथे आज दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास घरगुती सिलेंडर मधुन गॅस गळती झाल्यामुळे घरात सिलेडरचा भीषण अपघात झाला. या अपघातात लहान मुलांसह ९ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली असून ९ जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे जखमी अवस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

             सविस्तर माहिती अशी की बुधवारा येथील शिवा चिन्ना गौर व घरातील पुरुष मंडळी हे त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर गेले होते.

              घरी सर्व महिला उपस्थित असताना नविन सिलेंडर मधून गॅस गळती होत असल्याने त्यांच्या घरी असलेल्या सिलेंडर टाकीने अचानक पेट घेतला. त्यामुळे घरात उपस्थित असलेल्या ४ लहान मुलांसह ५ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने भारती शिवा गौर (५०),गंगाबाई रामलाल गौर (७०),उमा लखन गौर (५०),निकिता अक्षय गौर वय वर्ष ३० ममता संतोष गौर (३५), हंसिका संतोष गौर (१२),हंसिका मनीष गौर (९) आयुष अक्षय गौर (३), पियूष अक्षय गौर (६)असे ९ जण जखमी झाले आहेत. 

         घटनेची माहिती बुधवारा परिसरात वाऱ्यासारखी पसरताच,परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना ग्रामीण रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉ.अमोल नालट, डॉ. तरुण पटेल व त्यांच्या टीमने जखमींवर प्राथमिक उपचार केले. वृत्त लिहिस्तोवर जखमी हे ग्रामीण रुग्णालय येथे भरती होते. 

      जखमींमध्ये निकिता अक्षय गौर ही जास्त प्रमाणात भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.