भाजपा कार्यालय कुरखेडा येथे भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         आमदार कृष्णाजी गजबे यांचे जनसंपर्क कार्यालय कुरखेडा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत त्यांचे शैक्षणिक, सामाजिक व राजकीय जीवनातील संघर्ष या संदर्भात मार्गदर्शन केले. 

         यावेळी तालुका अध्यक्ष चांगदेवभाऊ फाये भाजपा जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे, ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री रवींद्र गोटेफोडे, भाजपा शहर अध्यक्ष सागर निरंकारी, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अँड उमेश वालदे वालदे, भाजपा जेष्ठ नेते तथा नगरसेवक रामभाऊ वैद्य, तालुका महामंत्री विनोद नागपूरकर भाजपा महिला तालुका अध्यक्षा जागृती झोडे ,तालुका महामंत्री जयश्रीताई मडावी, शहर अध्यक्षा कल्पना मांडवे,सोनाबाई मडावी, उर्मिला भांडारकर, नितीन कुथे,बंटी देवढगले,मंगेश मांडवे, लक्ष्मण धुळसे , धर्मा दरवडे, धर्मेंद्र दुमाने,विजय डहाळे, व भाजपा कार्यकर्ते व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.