छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार,विचार आणि चरीत्र युवा पिढींने अंगिकारावे :- नगराध्यक्षा लता लाकडे… –“शिवजयंती निमित्त प्रबोधनात्मक गीतगायनाचा कार्यक्रम”… –“प्रेस क्लब तालुका सावली आणि मित्र परीवाराचा उपक्रम”…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा प्रगड जातींना घेऊन स्वराज उभे केले,कोणावर अन्याय होऊ दिला नाही. पर स्त्रीला आपल्या माते समान मानले,अशा या आदर्श राजाचे आचार, विचार आणि त्यांच्यातील चरीत्र युवा पिढींनी अंगिकारावे व समाजात आपले आदर्श स्थान निर्माण करावे असे परखड मत कार्यक्रमाच्या उद्घाटक नगराध्यक्षा लता लाकडे यांनी व्यक्त केले.त्या प्रेस क्लब तालुका सावली आणि मित्र परीवार आयोजित शिवजयंती निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमात बोलत होत्या.

           प्रेस क्लब तालुका सावली आणि मित्र परीवार यांच्या सौजन्याने शिव जन्मोत्सव निमित्ताने समाज मंदिर ,सावली च्या प्रांगणात प्रबोधनात्मक गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरसेवक विजय मृत्यालवार, नगर.सेवक प्रफुल्ल वाळके,अंतबोध बोरकर, भोगेश्वर मोहुर्ले,अड पि.पि.शेंडे आदी उपस्थित होते.

   महारांजाचे कार्य आणि त्यांचा समाजीक वसा, त्यांच्यामध्ये असलेली दुरदृष्टी, युवकांना समाजावुन घेणे आवश्यक आहे, महाराज एक उत्तम प्रशासक होते,अनेक गड,,किल्ले सर करताना लष्कारांवरत्याचे बारकाईने नजर.असायची ,म्हणूनच स्वराज्याची निर्मिती त्यांनी उभी केली ,असेही मत नगराध्यक्षांनी व्यक्त केले.

       कार्यक्रमाची सुरुवात छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मार्लापण व दिप प्रज्वलनाने करण्यात आली,,कार्यक्रमात प्रबोधनात्मक गीतगायनात ,रेडिओ, लॉर्ड बुद्ध टि.व्ही सिंगर गायीका क्रांती मिनल.आणि संच यांनी वेगवेगळ्या गीतातून महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबा मेश्राम यांनी तर आभार लोकमत दुधे यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस क्लबचे सुधाकर दुधे,प्रमोद गेडाम, दयानंद खोब्रागडे, पद्माकर गेडाम, प्रकाश डोहणे , अभित गेडाम, शामा गेडाम आदींनी सहकार्य केले.