सावली तालुक्यातील शासकीय कार्यालये प्रभारावरच… — कार्यरत कर्मचारी किती वाहणार भार?… — लोकप्रतीनिधींनी लक्ष देण्याची मागणी…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

         तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून शासकीय कार्यालयामध्ये नियमित अधिकारी व कर्मचारी नसल्याने कामकाज खोळंबले आहे. त्यामुळे प्रभारी अधिकाऱ्यांकडून कामकाजाची खिंड लढविली जात आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी होत असतानाही याकडे शासन ,प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कार्यरत अधिकाऱ्यांची कामाचा भार वाहत पंचाईत होत आहे. शेवटच्या टोकावर असल्यामुळे या ठिकाणी अधिकारी येण्यासाठी टाळाटाळ करतात.

          त्यामुळे अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतरही ते वरिष्ठ पातळीवरून ऑर्डर रद्द करून दुसरीकडे निघून जातात, ही शोकांतिका आहे. शासन अधिकाऱ्यांना सर्व सोयी- सुविधा देतात. मात्र, अधिकारी शासकीय सेवा देण्यासाठी कुचराई करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सावली तालुक्यात अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत, प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आधीच कामांचे ओझे असल्यामुळे त्यांना अतिरिक्त ताण सहन करावा लागत आहे.

          त्यातच जिल्ह्याच्या ठिकाणी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये बराच वेळ निघून जात असल्याने तालुका पातळीवरील कामे कधी करायची?असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे या मनुष्यबळाच्या अभावामुळे सर्वसामान्यांचीही कामे प्रलंबित राहत असल्याने त्यांचा रोषाचा सामनाही कार्यरत अधिकारी , कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.

विविध कार्यालयातील परिस्थिती

1)सावली नगरपंचायत कार्यालयात अनेक वर्षांपासून मुख्याअधिकारी प्रभारी असून महत्वाची अनेक पदे रिक्त असल्याने शहरातील समस्या सोडविताना कामाचा ताण अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे.

2)सार्वजनिक बांधकाम उपविभागातील उपविभागीय अभियंता व शाखा अभियंता केव्हा येतात व केव्हा जातात हे समाजण्यापालिकडे आहे त्यामुळे करोडो रुपयांचे कामे दर्जाहीन होत असल्याची ओरड नागरिकांकडून होत आहे.

3) गटशिक्षणाधिकारी कार्यालयात अनेक महिन्यापासून अधिकारी नसल्याने प्रभारी विस्तार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे विस्तार अधिकारी यांना त्यांची नियमित कामे करून गटशिक्षणाधिकारी या पदाची कामे करावी लागतात त्यामुळे दोन्हीचा भार सांभाळताना अडचण निर्माण होत आहे.

4)भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि सावली तालुका हा भात उत्पादन म्हणून ओळखला जातो मात्र तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा कुचकामी असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे एकही पशुवैद्यकीय डॉक्टर मुख्यालयी राहत नाही तसेच येथील पशुवैद्यकीय अधिकारी सुद्धा प्रभारीच आहे.

5)तालुका कृषी अधिकारी कार्यालय दोन वर्षांपासून वाऱ्यावर आहे याठिकाणी अधिकारी सोडले तर कर्मचारीही नाही तालुका कृषी अधिकारी,मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक ,तांत्रिक कृषी अधिकारी ,कृषी सहाय्यक ही सारी पदे रिक्त असल्याने मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या भरोशावर डोलारा सांभाळला जात आहे.

6)सावली व पाथरी या दोन पोलीस स्टेशन अंतर्गत 94 गावे येत असून फक्त 59 पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत त्यामुळे कार्यालयीन कामे करणे आणि बंदोबस्त करणे यामुळे अतिरिक्त ताणाचा काम पडत आहे तसेच पी आय ची पोस्ट असताना ए पी आय च्या भरोषावर शांतता व सुव्यवस्था पार पडत आहे.

7)येथील ग्रामीण रुग्णालयात वैधकिय अधिक्षकासह,वैद्यकीय अधिकारी सुद्धा प्रभारी आहेत त्यामुळे आरोग्य सेवाच स्लाईनवर आहे. 

8)तीन महिन्यापासून सावली वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रभारीवरच आहे.

9)भूमी अभिलेख कार्यालय ,तलाठी ,ग्रामसेवक,शिक्षक ,कृषी सहाय्यक तसेच विविध कार्यालयातील विविध पदे रिक्त असल्यामुळे तालुक्यात कामाचा बोजवारा उडाला आहे तरी शासनाने तात्काळ अधिकारी ,कर्मचारी देण्याची मागणी सावली तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

कोट 

           सावली तालुक्यात अधिकारी व कर्मचारी गेली अनेक वर्षांपासून कमी असल्यामुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळत नाही शासनाने याची दखल घेऊन तात्काळ रिक्त पदाचा भरणा करावा आणि सामान्य जनतेला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.

      अनिल (मुन्ना)स्वामी 

अध्यक्ष,विविध कार्यकारी सहकारी संस्था ,सावली