लेखा येथे महासिद्ध यात्रा संपन्न… — जे एस पी एम महाविद्यालयच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने बजावली सेवा…

  भाविक करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधि 

         धानोरा तालुक्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारा लेखा या गावी राधेश्याम बाबा यांचे समाधी स्थळ आहे माघ पौर्णिमा निमित्त महासिद्ध यात्रा दरवर्षी आयोजित केली जाते यावर्षी शनिवारी 24 फेब्रुवारीला ही यात्रा भरली राधेश्यांबाबतच्या समाधी दर्शनासाठी अनेक जिल्ह्यातून तसेच परराज्यातून भाविक आले होते.

         त्यामुळे राधेश्याम बाबा या परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.ही यात्रा सकाळी धानोरा येथून त्यांची पालखी लेखा येथील राधेश्याम बाबा मंदिरापर्यंत निघाली त्यानंतर विविध कार्यक्रम समाधीस्थळाच्या परिसरामध्ये आयोजित करण्यात आले होते.यामध्ये कीर्तन आयोजित करण्यात आले होते.

            राधेश्याम बाबा पुण्यतिथी उत्सव समितीतर्फे माघ पौर्णिमेला यात्रा भरविण्याची गेल्या 47 वर्षापासून ची परंपरा आहे या यात्रेकरिता गडचिरोली जिल्ह्यातील भाविक तसेच गोंदिया भंडारा व परराज्यातून छत्तीसगड भाविक येत असतात तसेच यावर्षी चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया येथील भक्तगण व भजन मंडळी उपस्थित होते.

             यात्रा दरम्यान हजारो भाविकांनी यात्रेत सहभागी होऊन राधेश्याम बाबाच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले यात्रेदरम्यान अनुचित घटना घडु नये म्हणून पोलिसांकडून चोक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

             सकाळपासूनच यात्रा स्थळी धानोरा तालुक्यात सह छत्तीसगड राज्यातील अनेक गावांमधून भाविक दाखल झाले होते.याशिवाय उत्सव समितीच्या वतीने यात्रा स्थळी पूर्वतयारी आधीच करण्यात आली होती.

          त्यामुळे भाविकांना सुलभरीत्या दर्शन घेता आले या यात्रेदरम्यान मनोरंजनासाठी विविध स्टॉल सुद्धा लावलेले होते दुकाने लागलेली होती. यामध्ये खेळणी फुगे कटलरीचे तसेच कोलंबस झुला लहान मुलांचे झुले विविध साहित्य विक्रीस उपलब्ध होते. मनोरंजनाच्या साधना बरोबरच राधेश्याम बाबा मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या भाविका करता हा प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले होते.

         याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला असेच या कार्यक्रमासाठी महाप्रसादाच्या वितरण करण्याकरिता धानोरा तालुक्यातील जेएसपीएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक ज्ञानेश्वर बनसोड यांनी आपल्या राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या मार्फत व महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना सोबत घेऊन आपली सेवा बजावली विभागाकडून तसेच महाविद्यालय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी आपली सेवा बजावली ही सेवा जवळपास चार वर्षापासून या दिवशी आपली सेवा महाविद्यालय देत आहेत राधेश्याम बाबा महासिद्ध यात्रेत हजर दरवर्षी भावी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवत आहे.