अतिरिक्त कार्यभारावर चालतो नगरपंचायतचा भार… — इतर विभागातही विभाग प्रमुखांच्या जागा रिक्त…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधि 

        शहरातील नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांची गेली 1 वर्ष 3 महिने होऊन इतरत्र बदली झाल्यानंतर पालिकेचा कार्यभार प्रभारीवर सोपविण्यात आला असला तरी सदर अधिकारी पूर्णवेळ देऊ शकत नसल्याने शहरवासीयांची कामे खोळंबली असल्याचा सूर व्यक्त होत आहे.

        त्यामुळे नगरविकास विभागाने तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 1 वर्ष 3 महिन्यापूर्वी मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांची इतरत्र शासकीय बदली करण्यात आली त्यांच्या जागी कायमस्वरूपी मुख्याधिकरी देण्याऐवजी नोव्हेंबर 2022 ला मूल पालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर व आक्टोबर 2023 ला नागभीड चे राहुल कंकाळ यांच्याकडे सिंदेवाही व सावली अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

          मात्र तथापि ते पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने शहरातील जनतेची कामे खोडम्बल्या असल्याचा सूर नागरिकांनी व्यक्त केला आहे.कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किरकिर करावी लागत असल्याची व्यथाही नागरिकांनी बोलून दाखवली याशिवाय शहरात बहुतेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्याही वेळेवर येत नाही.

        उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून वातावरणात बदल होत आहे त्यामुळे साथीचे आजार सुरू असल्याने रुग्णाची मोठ्या प्रमाणात गर्दी दवाखान्यात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

         तसेच सावली शहरात रस्ते, नाल्यांचे कामे सुरू आहेत साहजिकच जबाबदार अधिकाऱ्याची नागरपंचयातला गरज आहे विशेषतः प्रभारी अधिकारी कंकाळ यांच्याकडे नागभीड पालिकेचा अवाढव्य कारभार पाहता त्यांच्याकडून पूर्णवेळ कारभाराची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. त्यामुळे शासनाकडे पाठवलेले विकासाचे विविध प्रस्तावदेखील रखडले आहेत.

          या प्रस्तावांवर शासनाकडे पाठपुरावा करण्याचीही आवश्यकता आहे. मात्र कायमस्वरूपी अधिकारी नसल्याने याबाबतही अडचणी निर्माण झाल्या आहेत निदान लोकप्रतिनिधींनि नागरपंचयातला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्ती करण्यासाठी ठोस पावले उचलावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

    घरकुलचा हप्ता मिळण्यास विलंब 

          सध्या सावली शहरात घरकुलचे बांधकाम मोट्या प्रमाणात सुरू असून घरकुलचे हप्ते मिळण्यास विलंब होत आहे. घरकुल लाभार्थी हप्ते मिळाले पाहिजे म्हणून पंचायत मध्ये जाऊन विचारपूस करीत असतात मात्र मुख्याधिकारी , स्थापत्य अभियंता व लेखापाल ही तिन्ही प्रमुख पदे प्रभारी असल्याने बांधकाम सभांधित, व इतर प्रशासकीय कामे ,घरकुलचे हप्ते वेळेत पूर्ण होण्यास विलंब तसेच अडचणी निर्माण होत आहे.

इतर विभागातही जागा रिक्त 

         सावली नगरपंचायत मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी लेखापाल ,स्थापत्य अभियंता ही तिन्ही प्रमुख पदे प्रभारी आहे त्यामुळे प्रशासकीय कामात नेहेमीच अडचण निर्माण होत असून जनतेची कामे होण्यास विलंब होत आहे.

       पंचायत मध्ये इतर विभागातही कर्मचाऱ्यांच्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त आहेत बहुतेक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कारभार म्हणजे अधिकचे कामे सोपविण्यात आले आहे त्यांचे नियोजन करताना अधिकाऱ्यांना अक्षरशः नाकेनऊ येत असते.

         नगरपंचायत मध्ये अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांची पदे भरण्यासबंधी पाठपुरावा संबंधित विभाग व लोकप्रतिनिधिकडे केला आहे.

    सौ.लताताई लाकडे 

अध्यक्ष नगरपंचायत सावली