आळंदीकरांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा : मुख्याधिकारी कैलास केंद्रे — आळंदी शहरातील गुरुवारी पाणी पुरवठा बंद…

दिनेश कुऱ्हाडे

   प्रतिनिधी

आळंदी : आळंदी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भामाआसखेड जलाशयातील विद्युत पुरवठा तांत्रिक कारणास्तव दि.27 एप्रिल रोजी बंद राहणार आहे या कारणांमुळे आळंदी शहरातील पाणी पुरवठा गुरुवार दि.27 एप्रिल रोजी मध्यरात्री एक पासून ते सायं.आठ वाजेपर्यंत बंद राहणार आहे तरी आळंदी शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सदर कालावधीमध्ये हवेली विभागाचा सुद्धा पाणीपुरवठा बंद राहणार आहे भामा आस्कर जलाशयामधून दि.28 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर हवेली विभागातील टप्पे करण्यात येणार आहे व दि.29 एप्रिल रोजी आळंदी गावठाणात सुध्दा पाण्यासाठी टप्पे करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याची दखल घेऊन येणाऱ्या कालावधीत पाण्याचा काटकसरी वापर करावा आणि नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आव्हान मुख्याधिकारी केंद्रे यांनी केले आहे.