प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा कुटुंबातील‌ वारसांना लाभ…

      राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

       दि गडचिरोली सहकारी बँक मर्यादित शाखा मालेवडा यांचा मार्फत तालूक्यातील मालेवाडा येथील खातेदार भास्कर मोतीराम गुंडरे यांचा नैसर्गिक रित्या आजाराने घरिच निधन झाले होते.

         त्यांनी बँक मध्ये प्रधानमंत्री जिवन ज्योती योजना व प्रधानमंत्री सूरक्षा विमा योजनेचा फार्म भरले असता त्यांच्या पश्चात त्याच्या परिवारातील वारस इंदूबाई भास्कर गुंडरे यांना दि गडचिरोली सहकारी बँक शाखा मालेवाडा ची शाखा व्यवस्थापक राजेश नाट यांच्या हस्ते लाभार्थ्यांना २ लाखांची रक्कम प्रदान करण्यात आली.

          यावेळी निरिक्षक वि.के मस्के लिपिक डि.जे.नाकाडे,एन.सी.नारनवरे,शुभाष गुंडरे,वाघाचे, नंदनवार शिक्षक उपस्थित होते.