Home उपक्रम आमदार कृष्णा गजभे यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियान कार्यशाळा व तालुका कार्यकारिणी...

आमदार कृष्णा गजभे यांच्या उपस्थितीत गाव चलो अभियान कार्यशाळा व तालुका कार्यकारिणी बैठक संपन्न…

ऋषी सहारे 

   संपादक

आरमोरी:- तालुक्यातील मौजा ठाणेगाव येथील धनवर्षा सभागृह येथे दिनांक ०४ जानेवारी २०२४ रोजी गाव चलो अभियान तथा भाजपा तालुका कार्यकारिणी आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती.

           यावेळी व्यासपीठावर आमदार कृष्णा गजबे, गडचिरोली चिमूर लोकसभा समन्वयक प्रमोदजी पीपरे, जिल्हा महामंत्री सदानंद कुथे सर, भाजपा जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, नगराध्यक्ष पवन नारनवरे, भाजपा तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री भारत बावनथडे, भाजपा महिला तालुकाध्यक्ष नीता ढोरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोविंदा भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ईश्वर पासेवार, भाजपा ज्येष्ठ नेते रामभाऊ पडोळे, भाजपा ज्येष्ठ नेते श्रीहरी कोपूलवार, भाजपा तालुका उपाध्यक्ष भास्कर बोडने आरमोरी, महिला बालकल्याण सभापती न प आरमोरी सुनीता चांदेवार व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन भाजप ग्रामीण तालुकाध्यक्ष पंकज खरवडे यांनी केले तर आभार भाजपा शहर अध्यक्ष गोविंदा भोयर यांनी मानले. यावेळी आरमोरी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व भाजपा विविध आघाडी तालुकाध्यक्ष, बुथ प्रमुख, शक्ती केन्द्रप्रमुख, बुथ संयोजक व बुथ पालक, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.