ब्रेकिंग न्युज… — पोस्को प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला व लागला फाशी…

ऋषी सहारे

   संपादक

 

गडचिरोली:-धानोरा पोलीस स्टेशन हद्दितील अल्प मुलीची छेडछानी करणारा पोस्को ऍक्ट मधील आरोपी अखेर पोलीसांना तुरी देऊन पळाला व काकडयेली गावाजवळ फॉसी लागला.

          मारंदा तालुका धानोरा येथील महेश नुसु पदा वय 32 वर्ष यांनी १० वर्षाच्या मेटा जांगदा येथील अल्पवयीन मुलगी सोबत छेडछानी केले असे मुलीनी आपल्या आईवडील व गावकर्यांना सांगीतले त्यामुळे गावकऱ्यांनी महेश याला पोलीस स्टेशन धानोरा येथे आणले मुलीच्या आई वडीलांनी दि. 3 फरवरी ला रिपोर्ट दिला. व पोलीसांच्या स्वाधिन केले. सदर

          मुलगा दोन दिवस पोलीस स्टेशन धानोरा येथेच होता. दि. ४ फरवरी चे रात्रौ तो पोलीस ठाण्यातुन पळाला व चक्क १५ कि.मी अंतर कापून काकडयेली च्या जंगलात रात्रौ फॉसी लागला. धानोरा पोलीसांची तारांबळ उडाली पोलीसांनी शोधा शोध केला परंतु महेश सापडला नाही. शेवटी दि. ५ जानेवारीला सकाळी तो फासी लागल्याच्या अवस्थेत काकडयेली गावकऱ्यांना दिसला. धानोरा पोलीसांनी महेश चा p.m . ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे केले व महेश च्या नातेवाईकांना यांचे लवकरात लवकर दफन करावयास सांगीतले . संध्याकाळी प्रेत मारंदा गावात नेण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे पोस्को प्रकरणातील केस पोलीसांनी मर्म केले आहे असे धानोरा ठाणेदाराचे म्हणणे आहे. परंतु ताबडतोब गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी महेशला बेदम मारहान तर केले नसावे असा संशय बळावला आहे. महेशचा काहीही दोष नसावा म्हणुन तर महेश ने बदनामीमुळे पोलीस ठाण्यातून पळाला असावा.

         रिपोर्ट दर्ज करून त्याला अटक न करणे . प्रेत लवकरात लवकर रफादफा करावयास लावणे ह्या सर्व हकीगत संशयास्पद वाटतात. गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक लक्ष देऊन महेश च्या नातेवाईकांना न्याय देणार का ? या कडे लक्ष लागून आहे.