पांदण रस्त्याचे खडीकरण निष्कृष्ट दर्जाचे… — चौकशी करण्याची धानोरी येथील शेतकऱ्यांची मागणी…

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

             कुरखेडा तालुक्यातील धानोरी येथील केवळराम बनसोड ते केवळराम मांदाळे यांच्या शेताकडे जानाऱ्या पांदण रस्त्याचे खडीकरणाचे काम ठेकेदाराने निष्कृष्ट दर्जाचे केल्याने त्या पांदण रस्त्याच्या रोडचे गिटटी निघने सुरू झाले असून शेतकरी बांधवांना पावसाळ्यामध्ये आपल्या शेतीमध्ये जात असताना मोठी अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

         ज्या उद्देशाने शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पांदण रस्त्याची योजना आखण्यात आली आहे त्याला ठेकेदार लोक निष्कृष्ट दर्जाचा काम करून मलाई खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप शेतकरी बांधवांनी केला असून पांदन रस्त्याचे खडीकरण निष्कृष्ट दर्जाचे करणाऱ्या ठेकेदाराच्या कामाची कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी धानोरी येथील शेतकरी निळू कल्लो, हिरालाल मेश्राम, रघुनाथ गुरूनोले ,गोपाल बनहसोड, दुलाराम बनसोड ,रवींद्र मेश्राम यांनी केली आहे.