मुलींच्या गटात अमरावती संघाची बाजी… — आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुली)…

 प्रेम गावंडे

  उपसंपादक

दखल न्युज भारत

            चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने चंद्रपुरात थाटात पार पडलेल्‍या ‘आमदार चषक’ राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धेत मुलींच्या गटात अंतिम सामन्‍यात नागपूर संघाचा ३-१ ने पराभव करीत अमरावती संघाने बाजी मारली.

            हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर व डेव्‍हलपमेंट ॲन्‍ड रिसर्च एज्‍युुकेशन सोसायटी (ड्रिम) चंद्रपूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने राज्‍यस्‍तरीय आमंत्रित हॉकी स्‍पर्धा (मुली) लोकमान्य टिळक हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, जिल्‍हा स्‍टेडीयमच्‍या बाजूला चंद्रपूर येथे पार पडली. या स्‍पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून मुलींचे संघ सहभागी झाले होते. 

           मुलींच्या गटात नागपूर आणि अमरावती संघात अंतिम सामना रंगला. अतिशय चुरशीच्या सामन्‍यात अमरावती संघाने नागपूर संघाचा ३-१ ने पराभव केला. तर तिसऱ्या स्‍थानी चंद्रपूर संघाने बाजी मारली. 

            मुलींच्या गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्‍या संघाला ट्राफी, रोख आणि मेडल देऊन आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्‍ते सन्‍मानित करण्यात आले. तर उत्‍कृष्ट कामगिरी करणाऱ्या बेस्‍ट स्‍कोरर, बेस्‍ट किपर, बेस्‍ट फॉरवर्ड, बेस्‍ट डिपेंडर, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ फायनल मॅच, बेस्‍ट प्‍लेअर ऑफ द टुर्नामेंट म्‍हणून खेळाडूंना गौरविण्यात आले. 

           यावेळी अरविंद दिक्षीत, सुरेंद्र अडबाले, प्रा. रवी झाडे, दिनकर अडबाले, सचिन मोहीतकर आदींची उपस्थित होती. तर स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रेम गावंडे अध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, अनिल निलेश सचिव ड्रीम चंद्रपूर, रुपेशसिंह चौव्हाण सचिव हॉकी प्रमोटर असोसिएशन चंद्रपूर, अभिजीत दुर्गे उपाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, निलेश शेंडे कोशाध्यक्ष ड्रीम चंद्रपूर, पंकज शेंडे, प्रभाकर टोगर, संध्या टोगर, अमोल सदभैय्ये, पंकज सदभैय्ये, आकाश इंगळे, लोकेश मोहुर्ले, दिनेश सावसागडे, सिद्धार्थ सूर्यवंशी, शुभम पुणेकर, शुभम साखरे, भारत विरुटकर, अपूर्व कुळसंगे, सोनाली गावंडे, आईशा खान, प्रियंका मंडळ, श्रुती भारती, निधी झाडे, समृद्धी गेडाम, शर्वरी लाभणे, करिष्मा राजपूत, दिक्षा चुनारकर आदींची परिश्रम घेतले.