अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अमरावती जिल्हा कार्यकारणी ची सभा संपन्न. 

युवराज डोंगरे/खल्लार 

           उपसंपादक

           अखिल अमरावती जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची सभा जिल्हाध्यक्ष गजानन चौधरी यांचे अध्यक्षते खाली व राज्य उपाध्यक्ष किरण पाटील सुभाष साहारे, नीलकंठ यावले, सुनिता पाटील, सतीश गुजरकर, संजय साखरे,अशोक चव्हाण, यांचे प्रमुख उपस्थितीत नुकतीच गव्हर्मेंट गर्ल हायस्कूल अमरावती येथे सभा पार पडली.

          या सभेमधे अनेक विषयावर चर्चा करून विविध ठराव मंजूर करण्यात आले.

          जिल्हा कार्यकारणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे सोबत झालेल्या चर्चेचा वृंतात सभेमध्ये ठेवण्यात आला.

             नवनियुक्त नांदगाव तालुका कार्यकारणी अभिनंदन ठराव पास करण्यात आला.

            ज्या तालुका कार्यकारीणीला तीन वर्ष पूर्ण झाले त्या कार्यकारणीची नव्याने गठित करण्यासंदर्भात जिल्हा संघ तर्फे सूचना देण्यात आल्या. नविन बदली जी. आर. बाबत चर्चा करण्यात आली. 

            या सभेकरिता जिल्हा संघाचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य तसेच प्रत्येक तालुक्यातून आलेले तालुका पदाधिकारी व तालुका कार्यकारणी सभासद आणि बहुसंख्य सामान्य सभासद उपस्थित होते असे प्रसिद्धी प्रमुख सुरज मंडे यांनी कळविले आहे.