आमदार आदित्य ठाकरे साहेब यांचे वाढदिवसनिमित्त मोफत रोगनिदान व आरोग्य शिबीर…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          कुरखेडा:-शिवसेना (उ.बा.ठाकरे गट) तालुका कुरखेडा यांचे वतीने युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे साहेब यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने”जनसेवा सप्ताह अंतर्गत चिखलि येथे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल यांचे मार्गदर्शनात अनुसया हाॅस्पीटल आरमोरी व उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा च्या सहकार्याने मोफत रोगनिदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला.

        शिवसेनेचे ब्रीद वाक्य ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण याला अनुसरुन कुरखेडा तालुक्यातील पाच जिल्हा परिषद क्षेत्रात मोफत रोगनिदान व आरोग्य शिबीर आयोजित करण्याचे ध्येय असल्याचे सुरेंद्र सिंह चंदेल यांनी यावेळी सांगितले. या आरोग्य शिबिरात एकंदरीत शंभर महिला व बावन्न पुरुषाचे रोगनिदान करुन मोफत औषध वाटप करण्यात आले.

       आवश्यक रक्त तपासणी,रक्त दाब तपासणी, शुगर तपासणी करण्यात आली. आरोग्य शिबिरात अनुसया हाॅस्पीटल आरमोरी च्या संचालक डॉ शिलु चिमुरकर ( MBBS.MD GYNECOLOGIST), डाॅ.त्रिवेंद्र कटरे, डाॅ राधेश्याम सरकार,सौ.शालिनी घोडाम सिस्टर,महालँब तंत्रज्ञ योगिता घोरमोडे,उपजिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ सपना तुरुकमाने यांनी रोगनिदान केले.

       आरोग्य शिबिराचे यशस्वीते करिता उपजिल्हा प्रमुख डाॅ.महेंद्र मोहबंसी, तालुका प्रमुख आशिष काळे,युवतीसेना जिल्हा संघटिका प्रा.उमा चंदेल यांचे मार्गदर्शनात उपतालुका प्रमुख राकेश चव्हाण, विभाग प्रमुख पुरुषोत्तम तिरगम यांनी प्रयत्न केले.स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचार्यानी सभागृह उपलब्ध करून सहकार्य केले.