मुरुमगाव येथे भागवत सप्ताहाचे आयोजन… — कलश यात्रेत सहभागी झाले भक्तगण… 

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

मुरुमगाव येथील अंजनीय मानस मंच यांच्यातर्फे दिनांक 8 ते14 फ्रेबुवारी दरम्यान हनुमान मंदिरच्या प्रांगणात श्रीमदभागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी हनुमान मंदिर पासून कलश यात्रा काढण्यात आली यात मोठ्या संख्येने भक्तगण सहभागी झाले.

           दररोज सायंकाळी ७ ते ११ वाजे पर्यंत श्रीमद् भागवत कथेचे पठण वृंदावन धामच्या हरिभक्त परायेन किशोरी संगीता अधिकारी यांच्या कोमल वाणी तून हरिकथेचे श्रवण करून भक्तगण हरिभजनात तल्लीन होतात.

          सदर भागवत कथेचे आयोजन सरपंच शिवप्रसाद गवरणा, मिंटू दत्त, शिवनाथ टेकाम, डॉक्टर निरंजन हलदर, लताताई पुंघाटे,डॉक्टर विश्वास, गणेश कापगते ,वीरेन हलदर,भूपेंद्र मडावी महाराज,नरेश बैरवार, जितू संगोडिया, अजमनजी रावटे,वसंत कोलियारा, बैसाखु कोटपरिया,धर्मराज गडपायले, गणेश भारद्वाज, रवी संगोडिया, उत्तम विश्वास, ओम देशमुख, बाळकृष्ण बोरकर,आदींनी केले आहे.