तहसील कार्यालयात राष्ट्रीय मतदार दिवस साजरा,मतदान यंत्राचे (E V M )चे सादरीकरण..

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

    कुरखेडा येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिवस विविध स्पर्धेचे आयोजन करीत साजरा करण्यात आला.

         या वेळेस उपविभागिय अधिकारी विवेक साळुंखे,तहसिलदार राजकुमार धनबाते,नायब तहसीलदार त्रंबक गुळदे सह विविध स्थानिक विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते.

      कार्यकमाचे प्रारंभी त्रंबक गुळदे यानी उपस्थीताना राष्ट्रीय मतदार दिवस संबधी शपथ दिली.तत्पशात शालेय विद्यार्थ्यांच्या मतदान विषयावर रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

          स्पर्धेचे परीक्षक उपविभागीय अधिकारी विवेक साळुंखे होते.प्रजासत्ताक दिनी विजेत्याना बक्षिस वितरण करण्यात आले.स्पर्धेच्या यशश्वीते करिता निवडणूक शाखेचे अव्वल कारकून अविनाश चुने,संगणक परिचालक सुभाष नंदेश्वर यानी प्रयत्न केले.