गायिका कडुबाई खरात यांच्या भीमगीतांची धूम… — आळंदी शहरात सिध्दार्थ ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन…

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : ‘आई बापाहून भीमाचं उपकार लंई हाय रं आपण खातो त्या भाकरीवर माझ्या बाबांची सही हाय रं, होता तो बापाचा बाप माझा भीमराव आंबेडकर’, आदी गीतांवर तरुणांनी ठेका धरत कडुबाई खरात यांच्या गीतांना आळंदीकरांनी दाद दिली.

 

आळंदी शहरात सिध्दार्थ ग्रुपच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बुधवार (दि.२६) रात्री डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील प्रांगणात भीमगीत गायिका कडुबाई खरात यांचा भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून सुरुवात झाली. यावेळी निलेश आल्हाट, डि.डि.भोसले पाटील, प्रशांत कुऱ्हाडे पाटील, सचिन गिलबिले, प्रकाश कुऱ्हाडे पाटील, अशोक उमरगेकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, सुनीता रंधवे, रुक्मिणी कांबळे, पुष्पा कुऱ्हाडे पाटील, आशिष गोगावले, अमित डफळ, चेतन कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, गोविंदा कुऱ्हाडे, आनंद वडगावकर आदी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.

 

सिध्दार्थ ग्रुपच्या वतीने गायक, कविचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आंबेडकरी वैभव खुने यांच्या वंदन गीताने झाली. डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे राज्य देशात आणण्यासाठी भीम अनुयायांनी क्रांती करावी, असा संदेश दिला. भीमानं माय सोन्यानं भरली ओटी, आमचा मास्टर शिकवितो, भीम माझा गं दिल्लीत भाषण देई, काल मुजरेच केले रे’ आदी गीते सादर केली. या संचातील गायकांनी दर्जेदार भीमगीते सादर केली. यावेळी महिलांचीं मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सिध्दार्थ ग्रुपचे रवींद्र राहुल रंधवे, योगेश रंधवे, विश्वजित थोरात, अक्षय रंधवे, चारुदत्त रंधवे, सुरज रंधवे, रोहित रंधवे, निखिल रंधवे आदींसह सिध्दार्थ ग्रुपचे पदाधिरी व सदस्यांनी परिश्रम घेतले.