पुरस्कार प्रोत्साहन देण्याचे काम करतात :- पद्मश्री परसुराम खुणे.. — शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठानचा पुरस्कार गौरव सोहळा म्हणजे उतंम कार्याची दखल..

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली -विदर्भात गणमान्य मानले जाणारे साकोली येथील शामरावबापू कापगते प्रतिष्ठान.

         या प्रतिष्ठानचा पुरस्कार गौरव सोहळा शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी श्रद्धेय शामरावबापू कापगते यांच्या पुण्यतिथी महोत्सव व श्रद्धेय नंदलाल पाटील कापगते यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने सदर गौरव सोहळा शहरातील श्री.संत लहरीबाबा मठ देवस्थान सभागृहात पार पडला.

             पद्मश्री पुरस्कार विजेते परसुराम खुणे अध्यक्षीय भाषणात म्हणाले की पुरस्कार प्रोत्साहन देण्याचे काम करतात.मला मिळालेला भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार हा माझ्या समाजाने दिलेला आशीर्वाद आहे असे यावेळी बोलताना सांगितले.

           या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून मंचावर माजी आ.बाळा काशीवार,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे,जि.प. सदस्य रचना गहाणे,साकोली ता.भाजपा अध्यक्ष प्रा.अमोल हलमारे,रवी अग्रवाल,न.प. माजी उपाध्यक्ष जगन उईके,प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ गजानन डोंगरवार,कोषाध्यक्ष माजी आमदार हेमकृष्ण कापगते,दुलीचंद कोसलकर उपस्थित होते.

             दुपारी २:०० वा.दिपप्रज्वलन करून स्वागत गीताने या पुरस्कार गौरव सोहळ्याला प्रारंभ झाला.शिक्षण महर्षी नंदलाल पाटील कापगते यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने या पुरस्कार सोहळ्याला आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झाले. 

          दरवर्षी प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव व राष्ट्रसेवा पुरस्कार यासारखे पत्रकारिता,साहित्यिक,आदर्श शिक्षक,कला,युवक,शेतकरी,युवती,वनश्री,गौरक्षण सेवा,सेवाव्रती,वैद्यकीय,खेळाडू, श्रमिक,कृषी-उद्योग या नावावर त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान केले जातात. 

             यातील एकूण १६ पुरस्कारांसाठी नागपूर,गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील ३५ पुरस्कर्त्यांची प्रतिष्ठान कार्यकारिणीच्या वतीने निवड करण्यात आली. 

            यात सुखराम कटरे,शिल्पा आस्वले,विद्या खेडीकर,ताराचंद कापगते,झामदेव येवले,अमित गि-हेपुंजे,शालीकराम बिसेन,विजय मेश्राम,प्राचार्य डॉ. चिंतामण खुणे,प्रा.डॉ.घनश्याम निखाडे,नामदेव शेंडे,डी.डी. वलथरे,महेंद्र राहांगडले,नारायण देशमुख,तुळशीराम भुरे,तनुजा नागदेवे,भारतलाल वडस्कर,नारायण डोंगरवार,घनश्याम पारधी,मयुरी दृगकर,पायल नागोसे,यशवंत कापगते,रवी भोंगाणे,नामदेव बोरकर,चैतराम निंबेकर,सोमा तरोणे,कैलास पटले,बंटी सोनकुसरे,डॉ.कृष्णकुमार शरणागत,डॉ.स्मिता डोंगरवार,डॉ.राकेश बोरकर,अँड. आशिष खेडीकर,मोहन देशमुख,जयपाल वलथरे,आणि ज्ञानेश्वर डोंगरवार यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले.

           तसेच शामरावबापू कापगते प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गजानन डोंगरवार यांनी पत्रकारांना भेट वस्तू दिल्या.या सोहळ्याला पुरस्कर्त्यांसह नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शामरावबापू कापगते प्रतिष्ठानचे डॉ शकुंतला कापगते इंजि.गोविंदराव गहाणे,भैय्याजी नाकाडे,दिलीप चित्रीवेकर,आत्माराम पटले,नामदेव लांजेवार,हिवराज लंजे आणि सागर बोरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

          सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सचिव मनिष कापगते यांनी केले.