गाढवी नदीच्या पुलावरील तुटलेल्या कठड्याचे काम सुरू….  — युवारंगच्या मागणीला आले यश…

प्रितम जनबंधु

    संपादक 

आरमोरी:- नेहमी, क्रीडा आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवारंग संघटना आरमोरी तर्फे मागील २ वर्षांपासून गाढवी नदीच्या पुलावरील तुटलेले कठडे लावण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना व सार्वजनिक महामार्ग विभागाला निवेदन देण्यात आलेले होते. 

                 या गंभीर विषयाची दखल घेत सार्वजनिक महामार्ग विभागाने गाढवी नदीच्या पुलावरील कठड्यांच्या दुरस्तीचे काम आज २९ एप्रिल २०२४ ला सुरू झाले आहे.

                     सदर कामाची पाहणी करण्यासाठी युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे व युवारंग चे संघटक पंकज इंदूरकर उपस्थित होते.