EVM जर कायमची हटवली असती,”तर.!

    “जगातील सर्वात मोठी आणि पारदर्शक लोकशाही आणि जिवंत आणि तेवत राहून,याचा आदर्श शेजारील राष्ट्रानी घेतला असता….आणि ते देखील आपल्या मार्गांवर येऊन आराजकतेला जगाच्या वेशिवर टांगले असते.

          EVM ला सेटिंग करून त्यावरच निवडणुका घेण्याचा दृढसंकल्प केल्यामुळे,आणि तसा विश्वास शिंदे आणि अजित गटाला मोदींनी दिल्यामुळेच आणि ED च्या भीतीमुळे दुसरीकडे मंत्रिपदाचे हाडूक चघळायला मिळाल्यामुळेच……

ही मंडळी रात्रीतून बाप बदलायला सुद्धा मागे पुढे पाहिले नाही…..!”

      “मन की बात आमच्यावर लादणारा आणि राष्ट्रवादीवर 70, 0000 कोटीचे भ्रष्टाचाराचे आरोप करणारा,तिसऱ्याच दिवशी त्याच भ्रष्टाचारी नेत्याला आपल्याच पक्षात घेणारा निर्लज्ज आणि खोटारडा,याचे उत्तर न देणारा नीतिमत्ता नसलेला प्रधानमंत्री आजपर्यंत या देशाने कधी पाहिला नाही..!

        तरी सुद्धा म्हणतो की अब की बार 400 पार,कशाच्या बळावर? तर केवळ आणि केवळ भाजपचे 4/4 संचालक असलेल्या BEL कंपनीत ज्यामध्ये या EVM तयार होतात…!”

      “E.D.आणि CBI च्या मदतीने प्रथम प्रशासनावर पकड मजबूत केली,त्यानंतर स्वतःच्या पक्षातील जेष्ठाच्या हाती नारळ दिले…..

         त्यानंतर या काळूबाळुनी विरोधी पक्षांचे पंख छाटले,आणि त्यानंतर जनतेच्या हातातून मताचा अधिकार काढून घेण्यासाठी EVM चाच वापर केला.!जेणेकरून,सुप्त मनसूबे बाहेर काढता येतील. 

       “परंतू,ही मंडळी एक बाजू सपशेल विसरत आहे,की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा की,”राजकारणात धर्मसत्ता प्रबळ ठरली तर,आम्ही आमचे स्वातंत्र्य कायमचे पुन्हा गमावून बसू.”

      त्याचप्रमाणे अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्ष मा.बराक ओबामा यांनी मणिपूर प्रकरणावरून भारताविषयी केलेले वक्तव्य दुर्लक्ष करण्यासारखे नाहीं. ते म्हणतात,” हे वेळीच रोखले नाहीं तर भारताचे अराजक्तेमुळे तुकडे होतील…..!

    याचा अर्थ काय….?

        याचा विचार प्रत्येक संविधाननिष्ठ आणि आंबेडकरवादी भारतीय नागरिकांनी लक्षात घेऊन जबाबदारीने कृतीतून वर्तन सिद्ध केलेच पाहिजे.

       त्यासाठी दुसऱ्या स्वातंत्र्य युद्धाची तयारी जरी करायची असेल तर मागे पुढे पाहता येणार नाहीं……!

 कारण, 

लोकशाहीला…….

संविधानाला……

आंबेडकरवादाला……

 मानवतेची झालर आहे…..!!!

म्हणून……

त्यासाठी,निःस्वारर्थपणे,त्याग,संघर्ष व समर्पनाची आवश्यकता आहे………… 

      नितीशकुमार सारखे राजकारणी भाजपच्या विरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी प्रथम पुढाकार घेतात,आणि प्रसंगावधान पाहुन पुन्हा त्यांच्याच मांडीवर जाऊन बसतात……

 हे काय आश्चर्य….?

       अशोक चव्हाण सारखे मुरब्बी राजकारणी ज्यांची खानदान पूर्ण काँग्रेसमध्ये राहून उच्चं पदे भोगली,ते सुद्धा एका रात्रीत बाप बदलतात….

   हे कोणते आश्चर्य…..?

       तर ही सर्व करामतीची जादू म्हणजे केवळ आणि केवळ सेटिंग केलेल्या EVM चाच प्रताप आहे……!

       आणि हा आत्मविश्वास या काळूबाळुनी सर्व दिग्गजाना दिल्यामुळेच यांनी नैतिकतेला तिलांजली दिली….!!!!

        या सर्व घटना ज्या घडत आहेत किंवा घडवल्या जात आहेत.यावरून एका इंग्लंडच्या ऐतिहासिक घटनेची आठवण येते………

      20 एप्रिल 1653 रोजी रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये सरसेनापतीने सेना घुसवली.प्रत्येक खासदारामागे एक बंदूकधारी सैनिक उभा केला.आणि स्वतः सरसेनापती स्पीकरच्या खुर्चीत बसून खासदारांना उद्देशून बोलले,” तुम्हाला जनतेनी या सभागृहात जनतेच्या कल्याणाचे कायदे करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी येथे मताधिकारातून पाठवले आहे.आणि तुम्ही हंडाभर कढीसाठी देश विकायला मागेपुढे पाहात नाहीत….!

        तुमच्यावर एक तरी गुन्हा शिल्लक आहे का? जो तुमच्यावर लागला नाहीं.तुमच्यात थोडी जरी लाज शिल्लक असेल तर,आत्ताच्या आत्ता या सभागृहातुन तुमचे तोंड काळे करा,अन्यथा माझे सैनिक तुमच्या गचांडीला पकडून बाहेर काढतील.”त्यानंतर सभागृह ताबडतोब रिकामे झाले…

    वरील घटनेचा अर्थ काय?

        तर आमचा भारत देश सुद्धा कोरोनाच्या गतीने,याच दिशेने वाटचाल करत आहे.

    अशी परीस्थिती या देशात या काळूबाळुनी EVM च्या बळावर निर्माण केलेली आहे….

        जरी कोणत्याही कारणाने अब की बार 400 पार हे स्वप्न साकार झालेच…….किंवा सत्तेत जरी आलेच……. किंवा इंडिया आघाडीचे सरकार जरी सत्तेवर आलेच…… तरी सुद्धा…..आत्ता मात्र आम्ही….”संविधान जागृती,ही बंद करणार नाही..

         कारण गेल्या 75 वर्षात केलेल्या चुका यापुढे होऊ देणार नाही.एक भारतीय सर्वसामान्य नागरिक म्हणून, त्यासाठी वाट्टेल तो त्याग करण्याची तयारी आम्ही ठेऊ..

   केवळ अपेक्षा एवढीच आहे की EVM ने घात करू नये…….

  त्याठीच……

 तोपर्यंत…..

Wait and Watch..

             आवाहनकर्ता 

             अनंत केरबाजी भवरे 

संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689