साकोली पुरस्कार सोहळ्यात पत्रकारांना नविन वर्षाच्या दिल्या भेटवस्तू..

      ऋग्वेद येवले 

नागपूर विभागीय प्रतिनिधी

       साकोली शहरातील श्री.संत लहरीबाबा मठ देवस्थानात श्रध्देय शामरावबापू कापगते स्मृती प्रतिष्ठान वतीने व श्रध्देय नंदलाल पाटील कापगते यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “पुरस्कार वितरण” सोहळ्यात भारत सरकारचे पद्मश्री पुरस्कार प्रणेते डॉ. परशुराम खुणे यांच्या हस्ते साकोली येथील पत्रकार अशोक गुप्ता,प्रा.ताराचंद कापगते,मनिषाताई काशिवार,आशिष चेडगे,ऋग्वेद येवले यांना सन्मानित करण्यात आले व शामरावबापू कापगते प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गजाननराव डोंगरवार यांच्या हस्ते नविन वर्षानिमित्त भेटवस्तू प्रदान करण्यात आल्यात. 

          याप्रसंगी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते,डॉ.श्वेता डोंगरवार,डॉ.शकुंतलाताई कापगते,सौ.कुंदाताई डोंगरवार,देवश्री कापगते,मधुकर कापगते,किशोर तिडके,वैभव कापगते व अन्य मान्यवर हजर होते. 

          संचालन माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी केले.