Home Maharashtra वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग वारंवार अपयशी का म्हणून ठरतोय.. — मनुष्य...

वाघांचा बंदोबस्त करण्यास वनविभाग वारंवार अपयशी का म्हणून ठरतोय.. — मनुष्य आणि पाळीव प्राणी महत्वाचे नाहीत काय?

उपक्षम रामटेके/शुभम गजभिये 

        चंद्रपूर जिल्हातंर्गत हिंस्त्र प्राणी असलेल्या वाघांची दहसत जिकडे तिकडे असल्याची बोंबाबोंब आहे.तद्वतच वाघा सारख्या हिस्त्र प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वनविभागाकडे कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही हे उघड आहे.

        यामुळेच महाराष्ट्र राज्यांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग त्यांच्या संरक्षित क्षेत्रात आणि इतर क्षेत्रात वाघांचा बंदोबस्त करण्यास आणि त्यांचे संगोपन करण्यास अपयशी ठरले असल्याचे दिसून आले आहे.

      अलीकडेच तेंदूपत्ता संकलन करताना सिंदेवाही,चिमूर,मूल, तालुक्यातील अनेक महिलांना वाघाच्या हल्ल्यात जिव गमवावे लागले आहे.वाघाच्या हल्यात कुटुंबातील व्यक्ती गमवल्याच्या घटनेमुळे कुटुंबातीलच व्यक्ती हतबल झाले असल्याचे दुःख आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत बोचत राहतय.

        वाघाच्या हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या आणि पुरुषांच्या कुटुंबियांची भरुन न निघणारी विपरीत हानी झाली.मायेचे छत्र हरपले गेले,आधाराविना मुले,मुली,पती,पत्नी पोरके झालेत.

         याचबरोबर ज्यांच्या पत्नी वाघाच्या हल्यात मेल्यात त्यांच्या पतीचे आयुष्य संगोपनाच्या आधाराविना जिवंतपणीच उद्ध्वस्त झाले.तर ज्यांचे पती वाघाच्या हल्यात मेले त्यांच्या पत्नींना जिवंतपणीच मरणयातना भोगावे लागण्याची वेळ येतय.

          वाघाच्या हल्यात मरणारा क्षण अत्यंत दुःखदायक असल्याने तो क्षण कुणालाही भरुन काढता येत नाही आणि मेलेल्या व्यक्तींची जबाबदारी पुनश्च कुणालाही घेता येत नाही किंवा भरुन काढता येत नाही.

          आजच्या स्थितीत वाघा सारख्या हिस्त्र प्राण्यांचा वावर अनेक गावात होऊ लागल्याने अनेक गावांतील नागरिक आणि पाळीव प्राणी असुरक्षित झाले आहे.

       रात्रोच्या वेळी स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा,हिस्त्र प्राणी असलेल्या वाघा पासून करायची कशी?हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना पडलेला आहे…

         काही वाघ एवढे धिट आहेत की ते बिनधास्त गावात प्रवेश करतात आणि गोठ्यात बांधलेल्या पाळीव प्राण्यांचा बळी घेतात.

             अनेक गावातील परिसरात व शेत शिवारात आढळून येणाऱ्या वाघांमुळे शेतकरी आणि नागरिक भयभीत झाले असून त्यांची सुरक्षा कोण करणार?हा यक्ष प्रश्न जाटील झालेला आहे.

        याचबरोबर नागरिकांची आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा महत्वाची आहे.पण,यावर वनविभाग गंभीरपणे विचार करायला तयार नसल्याने,त्यांना नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या बाबतीत मैत्रीपुर्ण भावना आणि अंतःकरणपुर्वक प्रेमळ हृदय नाही काय? असा ज्वलंत प्रश्न भयंकर वेदना देणारा आहे.

      मनुष्य आणि पाळीव प्राणी वाघाच्या हल्यात मेले तरी चालतील,परंतू त्या हिस्त्र प्राण्यांचा वेळेत बंदोबस्त करायचा नाही,हे वनविभागाचे अमानवीय दृष्टीकोनातील कोणते धोरण आहे? आणि वनविभाग नागरिकांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या सुरक्षा बाबत तत्परतेने विचार करायला तयार होणार काय? हे तर येणारा काळच उत्तर देईल!