Home कृषी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा...

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा नव्याने समाविष्ट करण्यात आलेला घटक राबविणे… — जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यांचे आवाहन…

ऋषी सहारे 

   संपादक

गडचिरोली : केंद्र पुरस्कृत योजना औषधी वनस्पती संवर्धन, विकास व शाश्वत व्यवस्थापन या योजनेंतर्गत सन २०१५-१६ पासुन राष्ट्रीय आयुष अभियान कार्यक्रम महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडलामार्फत राबविण्यात येत होता.

       तथापो सन २०२०-२१ पासुन औषधी वनस्पती घटक हा राष्ट्रीय आयुष अभियानाचा घटक नसल्याचे तसेच सन २०२१-२२ पासुन औषधी वलस्पती लागवड योजना बंद करण्यात आले आसल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे. सदरील घटक आयुष मंत्रालयाकडुन कृषि मंत्रालयाकडे हस्तांकरीत करण्यात आला आहे.

       तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत मोहत्सवी फळझाड / वृक्ष लागवड व फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्याबाबत दि. ३०/०४/२०२२ रोजी महाराष्ट्र शासनाकडुन निर्गम्त करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वर्य अर्जुन, सान, अशेका, बेहडा, हिरडा, बेल, टेटु, डिकेमाली, रक्तचंदन, रिठा, लोध्रा, आइन, शिवन, गुग्गुळ, बिब्बा व करंज या १६ वृक्ष वर्गीय औषधी वनस्पतींना अनुदान अनुज्ञेय आहे.

       एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत केंदेर शासनाच्या मार्गदर्शक सुचना दि. ३१/१२/२०२५ रोजी प्राप्ता झाल्या असुन सदरील मार्गदर्शक सुचनांमध्ये औषधी व सुगंधी वनस्पती लागवड हा घटक नव्याने समाविष्ट करण्यात आलेला आहे. औषधी व सुगंधी वनस्पती लागवड या घटकाकरिता केंद्र शासनाने सन २०२५-२६ मध्ये रक्कम रु४४०.०० लक्ष एवढ्या रकमेच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी दिलेली आहे.