प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
महाराष्ट्र राज्यात,”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम,राज्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन नुसार जाहीर करु शकतात याची माहिती सार्वजनिक झाल्याने,,”दडून बसलेले बिडातील स्वयंघोषित आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेले मुकबधीर जनमान्य नेते आता लोक हिताच्या बाता पुढे करुन फुस-फुस्स करु लागले असल्याचे दिसून येत आहे.
स्वयंघोषित आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेल्या भावना शुन्य नेत्यांना,” स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच,नागरिकांच्या विविध समस्या आता बारकाईने दिसू लागल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यातील नागरिक अनेक समस्यांनी ग्रस्त असताना,त्यांच्या जिवनावश्यक आणि मुलभूत समस्याकडे स्वयंघोषित आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेल्या भावना शुन्य नेत्यांना आतापर्यंत लक्ष देता आले नाही.
तद्वतच नागरिकांच्या मुलभूत आणि जिवनावश्यक गरजांवर आणि अधिकारांवर टाच आणणाऱ्या देशातील आणि राज्यातील सरकार विरोधात बोलता आले नाही किंवा त्यांच्यात बोलण्याची हिंमतच शिल्लक राहिलेली नाही असेच सत्य आहे.
असा पोकळ हिंमतीचे आणि पक्षातंर्गत बंदिस्त मनाचे लोक नेते असू शकत नाही किंवा ते जनतेचे नेतृत्व करण्याच्या लायकीचे राहात नाही,हे उघडच आहे.
महाराष्ट्र सरकारने सन २५-२६ वर्षातंर्गत अनुसूचित जातीचा आणि अनुसूचित जमातीचा,७५० करोड रुपये विकास निधी बेकायदेशीर पळवून नेला आणि या दोन्ही समाजांचा विकास खुंटवीला असताना हे बिडातील भावना शुन्य नेते कुठे लपून आहेत?
याचबरोबर धनगर,ओबीसी, समाजाच्या आरक्षणाला कायदेशीर मान्यता,महाराष्ट्र शासनाला सर्वोच्च न्यायालयाद्वारे किंवा केंद्र सरकार द्वारे अजूनपर्यंत मिळविता आली नाही.यावर बिडातील स्वयंघोषित आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेले नेत्यांचे मत काय?हे त्यांनी या समाजातील नागरिकांना,”स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिले सार्वजनिकरित्या सुस्पष्ट सांगितले पाहिजे या मताचा धनगर आणि ओबीसी समाज आहे.
देशासह महाराष्ट्र सरकारने खाजगीकरणाला विशेष महत्त्व देऊन महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांचे आणि महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.यावर सुध्दा बिडातील स्वयंघोषित नेत्यांनी आणि विविध पक्षाच्या दावणीला बांधलेल्या भावना शुन्य नेत्यांनी सार्वजनिकरित्या बोलले पाहिजे या प्रतिक्षेत समाज आहे.
धर्म आणि जातीचे राजकारण करुन देशातील भोळ्याभाबड्या नागरिकांची आणि मतदारांची मने एकमेकांच्या प्रती द्वेषी व रागीट करणाऱ्यांच्या बाबतीत आंदोलन न करणारे आणि कधीही न बोलणारे तकलादू नेते,हे नेते होवू शकतात काय? आणि ते समाजाचा विकास,”सम मनातून – सम विचारधारेला अनुसरून,करु शकतात काय?यावर सुध्दा भाष्य होणे काळाची गरज आहे.
नागरिकांच्या मुलभूत अधिकारांवर बंधने लादणारा बेकायदेशीर असा,”जनसुरक्षा कायदा,महाराष्ट्र सरकार पावसाळी अधिवेशनात बहुमताच्या जोरावर मंजूर करणार असल्याची चर्चा अख्या महाराष्ट्र राज्यात सुरु झाली आहे.या लोकविरोधी जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी हे बिळात लपून बसलेले सर्व पक्षातील भावना शुन्य नेते पुढे येणार काय? हे सुध्दा स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर समोर यायला हवे.
आतापर्यंत चूप असलेल्या वार्डातंर्गत गल्ली बोळ्यातील नेत्यांनी आतातर त्यांच्या वार्डातील समस्यांवर तोंड उघडणे सुरू केले आहे.त्यांच्या उघड्या तोंडावर आता समस्याच समस्या येवू लागल्या आहेत.
१) उत्तम नाल्यांची व्यवस्था व्हावी म्हणून निवेदन देणाऱ्या व पिण्याच्या स्वच्छ पाण्यांची व्यवस्था वेळेत व्हावी निवेदनाद्वारे मागणी करणाऱ्या नागरिकांसाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
२) नागरिकांनी आवागमन करणाऱ्या योग्य रस्त्यांसाठी आणि साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हे भावना शुन्य नेते वार्डात आले होते काय? आणि सदर समस्या त्यांनी निकाली काढल्या काय?
३) सार्वजनिक ठिकाणी बंद पडलेल्या दिवाबत्ती वेळेत सुरू करण्यासाठी आणि घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी या भावना शुन्य नेत्यांनी काही केले काय?
४) वर्षानुवर्षे सरकारी जागेवर घर बांधून राहणाऱ्या नागरिकांना मालकी हक्क पट्टा मिळावा म्हणून कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांसाठी भावना शुन्य नेत्यांनी आतापर्यंत काय केले?
५) नागरिकांच्या व मतदारांच्या सुरक्षात्मक हितासाठी आणि आवश्यक विकासासाठी या भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
६) शिक्षणाचे खाजगीकरण होणार नाही,प्राथमिक शाळा बंद पडणार नाही,भांडवलदारांच्या घशात शाळा जाणार नाही यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
७) निष्पाप आया बहिणींची अब्रू देशात लुटली जात असताना या भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
८) गोरगरिब नागरिकांच्या हाताला नियमानुसार काम मिळत नाही यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
९) अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती दिली जात नाही,यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
१०) शासनाकडून स्वतःचा समाज व बहुजन समाज असुरक्षित होत असताना या भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
११) शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
१२) गोरगरिबांच्या मुलांनी उच्च शिक्षण घेऊ नये म्हणून केंद्र सरकारने शिक्षण कार्यपद्धत महागाडी केली यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
१३) महत्त्वपूर्ण सरकारी कार्यालयात नोकर भरती प्रक्रिया राबवितांना अजूनही भेदभाव व जातीभेद केला जातो आहे.अशा केंद्र सरकारच्या अयोग्य निती विरोधात भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
१४) धार्मिक व सामाजिक भेदभाव कमी करण्यासाठी या भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
१५) सर्व बहुजन समाजातील नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक विकास समप्रमाणात व्हावा यासाठी भावना शुन्य नेत्यांनी काय केले?
असे अनेक प्रश्न आहेत,ज्याचे उत्तर मतलबी,लुटारु,द्वेषी,अहंकारी,भेदभावी,भावना शुन्य नेत्यांकडे नाही..
यामुळे समाज मनाला जागरुक करणारे आणि समाज मनाला स्वहितासाठी व स्व- उन्नतीसाठी संघर्षमय दक्ष तथा तत्पर करणारे,सक्षम नेतृत्व म्हणजे उत्तम नेते होय हि परिभाषा भावना शुन्य नेत्यांना कधीच कळणार नाही हे वास्तव आहे.



