माहेर महिला मंच द्वारे रास गरबा महोत्सव २०२३ चा शुभारंभ…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

कन्हान :-

             नगरपरिषद क्षेत्रांतर्गत माहेर महिला मंच द्वारे आयोजित कुलदिप मंगल कार्यालय जवळील मैदानात रास गरबा महोत्सवाचे माजी मंत्री राजेंद्र मूळक यांचा हस्ते दिप प्रज्वलित करून कार्यक्रमाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. 

           शुक्रवार (दि.२०) ला नवरात्री उत्सव निमित्य बालाजी सेलिब्रेशन लॉन जे.एन.रोड कुलदीप भवन तारसा रोड चौक जवळ माहेर महिला मंच द्वारे (दि. २०) ते (दि.२३) ऑक्टोंबर पर्यंत च्या रास गरबा महोत्सव २०२३ चे माजी मंत्री व अध्यक्ष काँग्रेस कमेटी नागपुर जिल्हा ग्रामिण राजेंद्र मूळक,पर्यटक मित्र रामटेक चंद्रपाल चौकसे,माजी अध्यक्षा जि.प.नागपुर व सदस्या रश्मी बर्वे,पं स सभापती मंगला निबोणे तसेच रास गरबा महोत्सवाचे आयोजक राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ नागपुर क्षेत्र अध्यक्ष तथा कॉ.क.ना.जि.ग्रा उपाध्यक्ष नरेश बर्वे,ॲड.राजकुमारी राय,माहेर महिला मंच कन्हान अध्यक्षा व कन्हान महीला काँग्रेस कमेटी अध्यक्षा रिता बर्वे यांच्या शुभ हस्ते पुजन व घटस्थापना करून रास गरबा दांडिया महोत्स वाचा शुभारंभ करण्यात आला.

           याप्रसंगी एन एस मालविये,सुनिल सरोदे,योगेंद्र रंगारी,मनिष भिवगडे,सुभाष तडस,चंद्रमणी भेलावे,बळवंत पडोळे,शरद वाटकर,निखिल पाटील,करूणा भोवते,गुंफा तिडके,कु.रेखा टोहने,सुनिता मानकर,मिना ठाकुर,विशाखा ठमके,सुनिता भेलावे,संध्या सिंह,आशा राऊत,शारदा खंडेलवाल,सविता बावणे,सिद्धार्थ ढोके,रोहित बर्वे,गौतम नितनवरे,नरेश लक्षणे,प्रदीप बावणे,अजय कापसिकर,पवन सेलोटे,सूरज नवघरे,सागर नवघरे आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने गरबा कलाकार आणि रसिक प्रेक्षक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.