सोमवारला जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन…..

प्रितम जनबंधु

   संपादक 

गडचिरोली:-

           विजयादशमीच्या पृष्टभूमिवर, 23 ऑक्टोबर रोजी सोमवारला गडचिरोली जिल्हा गोटूल समिती तथा आदिवासी विद्यार्थी संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचे आयोजन चामोर्शी रोडवरील महाराजा सेलिब्रेशन हॉल येथे दुपारी 1 वाजता करण्यात  आले असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी व नंदूभाऊ नरोटे यांनी घेतलेल्या पत्रपरिषदेतून दिली. यापूर्वी सकाळी 10.30 वाजता स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबीर व ग्रामसभांचे सक्षमीकरण व बांबू व्यवस्थापन कार्यक्रम घेण्यात येणार आहे.

             या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे, खासदार ओक नेते, आयोजक तथा सत्कारमुर्ती आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव किरसान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, महेंद्र ब्रम्हणवाडे तर मार्गदर्शक म्हणून सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, आदिवासी विकास विभागाचे अप्पर अयुक्त रविंद्र ठाकरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, नागपूर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. श्याम कोरेटी, गोंडवाना विद्यापीठाचे डॉ. नरेश मडावी, मिशन आय. ए. एस. अ‍ॅकडमी अमरावतीचे डॉ. नरेशचंद्र काठोळे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची उपस्थित राहणार आहे.

          दुसर्‍या दिवसी 24 ऑक्टोबर रोजी मंगळवारला सकाळी 11 वाजता आदिवासी देवी देवतांची महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सहउद्घाटक म्हणून देवरीचे माजी आमदार संजय पुराम तर अध्यक्षस्थानी गोटूल समितीचे उपाध्यक्ष देवाजी तोफा राहणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणून आमार डॉ. देवराव होळी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, अजय कंकडालवार, नंदू मट्टामी, डॉ. नरेंद्र कोडवते, शिवा कोकोडे, रोजा करपेत, रविंद्रबाबा आत्राम, राहूल कन्नाके, डॉ. तीमेश्‍वर कोरेटी,झनकलाल मंगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

          यावेळी या दोन दिवसीय कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीवर आधारीत सांस्कृतिक स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा खुली असून केवळ आदिवासींच्या संस्कृतीला अनूसरूनच स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी घ्यावे असेही ते म्हणाले. एकंदरीत या सर्व कार्यक्रमामध्ये आदिवासींच्या संस्कृतीवर भर देण्यात येणार्‍या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी व आविसंचे सरसेनापती नंदूभाऊ नरोटे यांनी केले आहे.