जे एस पी एम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

धानोरा प्रतिनिधी

भाविक करमनकर 

     दिनांक 21/06/2023 रोजी जे एस पी एम महाविद्यालय धानोरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी उपस्थित सर्व कर्मचारी यांना शारीरिक शिक्षण विभागप्रमुख प्रा डॉ संजय मुरकुटे यांनी योगासन करायला लावले आरोग्या साठी योगासने करणे किती फायदे आहे हे सविस्तरपणे सांगण्यात आले. योगा केल्याने व्यक्तीचे मन, आणि शरीर नियंत्रित करण्यास मदत करते,मानसिक संतुलन राखता येते यासोबतच तणाव आणि चिंता मुक्त राहता येते दरवर्षी २१ जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो.

      या प्रसंगी महाविद्यालयचे प्राचार्य यांनी सर्व कर्मचाऱ्यांनी दररोज योगासने करून निरोगी व रोगमुक्त जीवन जगावे असे मत व्यक्त केले यावेळी नाव दिल्याचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण सर प्रा डॉ किरमीरे सर प्रा डॉ चुदरी सर प्रा डॉ वाघ सर प्रा डॉ विना जंबेवार मॅडम प्रा डॉ लांजेवार सर प्राडॉ मुरकुटे सर प्रा ज्ञानेश बनसोड सर प्रा डॉ झाडें सर प्रा नितेश पुण्यप्रेड्डीवार सर प्रा मानतेश तोंडरे सर प्रा डॉ प्रियंका पठाडे मॅडम भैसारे मॅडम प्रा धाकडे सर प्रा खोब्रागडे सर प्रा वटक मॅडम प्रा करमणकर सर प्रा रणदिवे सर प्रा मांडवगडे सर मनोज ननावरे राकेश बोनगीरवार बालाजी राजगडे भास्कर वाढनकर इत्यादी उपस्थित होते.