स्वस्त धान्य दुकानदार संघटना धानोरा यांच्या वतीने नवनियुक्त तहसीलदारांचे स्वागत..

धानोरा /भाविक करमनकर 

      दिनांक 19 जून 2023 रोजी नवनियुक्त तहसीलदार साहेब विशाल सोनवणे यांचे स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. स्वागतावेळी संघटनेचे अध्यक्ष जाकीर कुरेशी , सचिव नरेंद्र उईके , उपाध्यक्षा सौ. सुनीता झंझाड , प्रसिद्धी प्रमुख समीर कुरेशी , सदस्य माणिक गेडाम, जमील शेख , अजित मडावी , सौ. निरुताई इंदूरकर व स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते. तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मी सतत पाठपुरावा करत राहीन तसेच ऑक्टोबर 2022 ते मे 2023 पर्यंतचे कमिशन त्वरित मिळण्यासाठी मी प्रयत्न करेन असे तहसीलदार साहेबांनी आश्वाशीत केले.