पारशिवनी पंचायत समीती सभागृह येथे अमृत महाआवास अभियान योजनात तालुक्यातील पुरस्कृत अधिकारी यांना ना.आमदार अँड आशिष जैस्वालच्या हस्ते पुरस्कार  करण्यात आले.

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी:- दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी शुक्रवार ला  पंचायत समिती पारशिवनी च्या सभागृहात  येथे मा. ॲड. आशिषजी जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र यांच्या अध्यक्षते खाली तालुकात अमृत महाराज अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले होते.

यावेळी तालुकातील  विविध ग्रामपंचायतींना महा आवास योजने मध्ये पुरस्काराचे वितरण मा. ॲड. आशिषजी जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र  यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी  पंचायत समिती पारशिवनी च्या सभापती मा सौ मंगलाताई उमराव निबोने .उपसभापती कुमारी करुणाताई भोवते . जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रश्मीताई बर्वे जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई दिपक भोयर, मा सुभाष जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, पंचायत समिती सदस्य मीनाताई कावळे . चेतनजी देशमुख . तुलसीताई प्रदिप दियेवार  इत्यादी उपस्थित होते.

पुरस्कार वितरण करताना जिल्हा परिषद नागपूर मध्ये पंचायत समिती पारशिवनी यांनी द्वितीय पुरस्कार पटकावल्यामुळे सभापती मंगला निबोन यांनी घरकुल बांधकामामध्ये पुढाकार घेऊन केलेल्या कार्यामुळे मा आमदार साहेब यांनी सभापती सौ मंगलाताई निंबोने यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करून सम्मानित केला व  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत आवास योजनांना गतिमान करणे व गुणवत्ता वाढीसाढी राज्यात स्वातंत्राचा अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधुन राज्यात अमृत महाआवास अभियान २०२२-२३ राबविण्यात आले होते. त्याअनुषंगाने अमृत महा आवास अभियान अंतर्गत पुरस्कार वितरण सोहळा  राबविण्यात आलेल्या अभियान         श्री. अॅड. आशिषजी जयस्वाल, आमदार, विधानसभा क्षेत्र रामटेक यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच मा. सौ. मंगलाताई निंबोने सभापती, पंचायत समिती पारशिवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकास्तरीय उत्कृष्ट घरकूल बांधकाम पुरस्कार ,(१) सर्वोत्कृष्ट पंचायत समीती ला प्रधान मंत्री आवास योजना ग्रामीण साठी पंचायत समीती चे गट विकास अधिकारी सुभाष जाधव

(२) सवोत्कृष्ट ग्राम पंचायत चा पुरस्कार आदिवासी दुर्गम भागाची  कोलीतमारा ग्राम पंचायत चे सरपंच कलीराम उईके  ग्रामसचिव सचिन देशमुख

(३) सवोत्कृष्ट क्लस्टर राज्य पुरस्कार योजने साठी राज्या तुन प्रथम पुरस्कृत पंचायत समितीचे मनोहर बाबुलाल जाधव यांना  राज्यतुन प्रथम पुरस्कार

सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व शॉल श्रीफळ) पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात  .  याना  पुरस्कार सन्मान चिंन्ह, प्रशस्तीपत्र व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच महिला बचत गटांना मंजूरी पत्राचे वाटप केलेयाप्रमाणे तालुक्यांमध्ये प्रत्येक योजनेमध्ये आपण सक्रिय सहभाग घ्यावा असे प्रतिपादन केले .

यावेळी तालुका तिल सर्व पंचायत समिती कर्मचारी ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच प्रतिष्ठित नागरिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.