धानोरा तालुका प्रतिनिधी
भाविक करमनकर
धानोरा येथे अखिल भारतीय विज्ञान मेळावा अंतर्गत एक दिवसीय वकृत्व स्पर्धा जिल्हा परिषद धानोरा येथे काल दिनांक 18/8/2023ला आयोजित करण्यात आली होती.यात प्रथम क्रमांक गणेश अलंकार विद्यालय निमगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी कुमारी राणि लालाजी खोब्रागडे हिने प्राप्त केले त्याबद्दल तिचे अभिनंदन करन्यात आले.आणि ति जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलि आहे.
प्राचार्य व्हि.एम.सुरजुसे यांच्या अध्यक्षतेखाली जेष्ठ विस्तार अधिकारी आखाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्य मँडम विस्तार अधिकारी,उसेंडी सर केंद्रप्रमुख धानोरा,कोहाडे सर जि.प.धानोरा आदि मान्यवर उपस्थित होते.परिक्षक म्हणून महेद्र कुकडकार , निशिकांत शामकुळे,अशोक पाळवदे, विनोद रायपुरे यांनी काम पाहिले.धानोरा तालुक्यातील एकुण 13 शाळेतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.वकृत्व स्पर्धेचा विषय होता.
भरडधान्य -एक उत्कृष्ट पौष्टिक अन्न की आहार भ्रम हा होता.या स्पर्धेत
प्रथम क्रमांक- कु.राणी लालाजी खोब्रागडे गणेश अलंकार विद्यालय निमगाव.हिने पटकावला तर
द्वितिय क्रमांक-आकांक्षा सुभाष बमनवार ,कै.महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव.
तृतिय क्रमांक- खुशी प्रदिप गावतुरे,जि.प.हायस्कूल धानोरा.हिने मिळविला.या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, क्रमांक मिळविणारा विद्यार्थीची निवड जिल्ह्यस्तरावर झालेली आहे.कार्यक्रमाचे संचालन एस.एम.रत्नगिरी यांनी केले तर तोटावार यांनी आभार मानले.मुख्याध्यापक बि.डब्लु.सावसाकडे,विषय शिक्षिका भारती श्रीरामे, दिवाकर भोयर शिक्षक,नागदेवते सर,नाकतोडे सर यांनी अभिनंदन केले आहे.