अनिल किरणापुरे यांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार.. — कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सन्मानित. 

 

संजय टेंभुर्णे 

कार्यकारी संपादक दखल न्युज

भंडारा: –

     कै.वसंतराव नाईक यांच्या ४४ व्या स्मृतिदिन सोहळा निमित्ताने शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय पुसद, येथील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात विदर्भातंर्गत नागपूर विभागामधून अनिल शिवलाल किरणापुरे यांना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते कै. वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला.

          कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.श्री.धनंजय मुंडे कुषी मंत्री, प्रमुख पाहुणे, डॉ. एन.पी.हिराणी,मनोहर नाईक, विजय पाटील चोंढीकर ,अविनाश नाईक, प्रा.गोविंद फुके, अँड . आमदार निलय नाईक ,आमदार अँड इंद्रनील नाईक ,कृषी भूषण संस्था अध्यक्ष दीपक आसेगावकर ,ययाती नाईक,धनंजय सोनी, जय नाईक, डॉ. अत्यंत रुद्रवार, अप्पाराव चिरडे,सुरेश पाटील ,जयंतराव पाटील , अखिल मेमन, अनिल नाईक, विजय जाधव ,अनिरुद्ध पाटील, निळकंठ पाटील, शिराज हिरानी व विदर्भातून आलेले शेतकरी गुरुदेव श्रीरंगे,महाराष्ट्रातून आलेले सर्व शेतकरी बांधव महिला शेतकरी, युवा शेतकरी उपस्थित होते.

         कार्यक्रमाप्रसंगी श्री.जी.सी. मेश्राम बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चंद्रपूर यांनी बांबूचे उत्पादन बांबू आधारित उद्योग व शासनाच्या विविध योजना या विषयावर मार्गदर्शन केले , कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी भूषण दीपक आसेगावकर,आभार प्रदर्शन जयंत पाटील यांनी केले.