Home देशविदेश १२ कोटींना लावला चूना,२ संचालका विरुद्ध गुन्हा दाखल…. — ताडबा व्याघ्र...

१२ कोटींना लावला चूना,२ संचालका विरुद्ध गुन्हा दाखल…. — ताडबा व्याघ्र प्रकल्पातंर्गत आँनलाईन सफारी बुकिंग मध्ये गडबड….

 

दिक्षा कऱ्हाडे  

वृत्त संपादीका 

  प्रेम गावंडे 

 उपसंपादक 

          चंद्रपूर:-

        फिर्यादी सचीन उत्तम शिन्दे विभागीय वन अधिकारी ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प यांनी आँनलाईन सफारी बुकिंगच्या नावाखाली ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला १२ कोटी रुपयांच्या वर चूना लावत फसवणूक केल्या बाबत रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली.

       १० डिसेंबर २०२१ ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीचे ऑनलाईन बुकींग करणे करीता अभिषेक विनोदकुमार ठाकुर व रोहीत विनोदकुमार ठाकुर दोन्ही रा. प्लॉट क्र. ६४ गुरुद्वारा रोड चंद्रपूर यांचे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशन व कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यांचे दरम्यान १० डिसेंबर २०२३ रोजी सर्विस लेवल अर्गिमेंट द्वारे अटी व शर्तीवर कायदेशीर करार केला होता. 

              परंतु सदर आरोपीने कंपनी / संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन केले.

          त्यावरुन ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठा चंद्रपूर (टी.ए.टी. आर) ने सन २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ व सन २०२३ -२४ या वर्षाच्या ऑडीट करण्यात आले.

            त्या ऑडीट अहवालात नमुद नुसार सदर कालावधीमध्ये आरोपीत कंपनी / संस्थेने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूर यास २२,८०,६७,७४९/- रुपये देणे होते. 

          त्यापैकी त्यांनी १० कोटी ६५ लाख १६ हजार ९१८- रु. भरणा केला आहे.सफारी बुकींगची उर्वरीत रक्कम १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ /- रुपये टी. ए.टी.आर. ला भरणा न करता आरोपीने कंपनी / संस्थेच्या पार्टनर्सने करारनाम्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन विश्वासघात करुन रुपये १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ /- शासकीय रक्कमेचा अपहार केला असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

           तक्रारकर्त्याच्या तक्रारी वरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे चंद्रपूर वाईल्ड कनेक्टीव्हीटी सोल्युशनचे संबंधीत आरोपी 1) अभिषेक विनोदकुमार ठाकुर 2) रोहीत विनोदकुमार ठाकुर दोन्ही रा. प्लॉट क्र. ६४ गुरुद्वारा रोड चंद्रपूर यांचे विरुध्द पोलीस स्टेशन रामनगर अपराध क्रमांक ९३७ / २०२३ कलम ४२०, ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.