ऋषी सहारे
संपादक
आज भंडारा येथील विश्रामगृहात भंडारा-पवनी विधानसभेच्या तालुका कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती….
या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भारत राष्ट्र समितीचे पूर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण भाऊ वाघमारे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून प्रकाशजी मालगावे,धनंजयजी मोहकर व अरविंदजी भालाधरे हे प्रामुख्याने उपस्थित होते..
या कार्यक्रमांमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी व काही ग्रामपंचायत सदस्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये पक्षप्रवेश घेतला,त्याचबरोबर या बैठकीमध्ये लोकांपर्यंत पोहचून कशाप्रकारे लोक हिताचे काम पक्षाच्या माध्यमातून करावे व कार्यकर्त्यांनी जनसंपर्काच्या माध्यमातून बी. आर .एस.पक्ष लोकांच्या अंतर्मनात रुजवावे अशा प्रकारचे मार्गदर्शन उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना दिले.यावेळी बैठकीला भंडारा-पवनी तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.