Home Political समाजवादी पक्षाची आढावा बैठक संपन्न… — राजकुमार मलगाम यांनी घेतला समाजवादी...

समाजवादी पक्षाची आढावा बैठक संपन्न… — राजकुमार मलगाम यांनी घेतला समाजवादी पक्षात प्रवेश.. — राजकुमार मलगाम होऊ शकतात – समाजवादी पक्षाचे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे उमेदवार…

पंकज चहांदे

तालुका प्रतिनिधी

दखल न्यूज भारत

देसाईगंज :- समाजवादी पक्षाची देसाईगंज विश्राम गृह या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक संपन्न झाली सदर बैठकीत देसाईगंज शहरांतील विविध मुद्यानवर आंदोलन करण्याकरिता नियोजन बांधणी करण्यात आली.

        देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ता राजकुमार मलगाम यांनी आज जिल्हा अध्यक्ष इलियास खान यांच्या हस्ते आणि समाजवादी पक्षाच्या विचारसरणीवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश घेतला.

        सदर बैठकीत येणारी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आसिम आजमी आणि प्रदेश कार्याध्यक्ष प्रतापरावजी होगाडे, प्रदेश प्रमुखमहासचिव परवेज सिद्धिकी यांच्या आदेशाने आरमोरी विधानसभा समाजवादी पार्टी स्वबळावर लढणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात करण्यात आले. बैठकीत सुनीता चौधरी आणि कमल नैताम यांनी पक्षात प्रवेश घेतला.

     सदर बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष आमिर यासिनी, अल्पसंख्यांक विभाग जिल्हा अध्यक्ष खलील खान, अल्पसंख्याक विभाग महासचिव महेबूब शेख, जिल्हा संघटक मो जाफर शेख, महिला सभा अध्यक्षा सीमाताई डोंगरे,अल्पसंख्यांक विभाग जिल्हा उपाध्यक्ष मुजीब शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष डोमाजी दिवटे, जिल्हा पदाधिकारी जिब्राईल शेख, जब्बार शेख, हाजरा बेगम, सोशल मीडिया अध्यक्ष प्रमोद करंडे,मुन्ना शेख, कदीर बारसागडे,कल्पना ताई आदी उपस्थित होते.