राजवर्धन पाटील यांच्या हस्ते इंदापूर महाविद्यालयातील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन…

 

नीरा नरसिंहपुर दिनांक :18

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार,

   इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर जि. पुणे व नारायणदास रामदास हायस्कूल व जुनिअर कॉलेज इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त भव्य आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

   राजवर्धन पाटील म्हणाले की,’ युवाशक्ती मोठी असून या शक्तीच्या विधायक कार्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा त्यांना प्रेरणा देणाऱ्या असतात. पुढील वर्षी जिल्हा पातळीवरील क्रिकेट सामने भरवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.

   महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन सांघिक उत्तम प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायणदास रामदास प्रशालेचे मुख्याध्यापक संजय सोरटे यांनी केले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ व कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा. बापू घोगरे यांनी केले.

   कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी मानले.