वैनगंगा शारीरिक महाविद्यालय साकोली येथे धनुर्विद्या प्रशिक्षणाचे आयोजन…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी 

         साकोली -वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित वैनगंगा शारीरिक महाविद्यालय साकोली येथे धनुविद्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

         कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील चतुर्वेदी यांनी धनुर्विधीचे महत्त्व सांगताना धनुविद्याही एकाग्रता फोकस धनुष्यबाण या खेळांना विशेष महत्त्व देऊन धनुविद्याचे महत्त्व सांगितले.

         कार्यक्रमाचे मुख्य प्रशिक्षक श्री रवी रंगारी यांनी धनुविद्या ही जीवनात कसे अत्यंत महत्त्वाची आहे असे पटवून दिले. तसेच या कार्यक्रमाप्रसंगी लाभलेले राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार ठाकूर यांनी धनुर्विद्यामुळे मानवाच्या आत्मविश्वास मजबूत होतो. लक्ष निर्धारित करता येते, जीवनामध्ये ललितपणा आणि स्वतःला मजबूत करण्यासाठी संधी देते असे सांगितले आहे.

        या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राजश्री मॅडम प्रा. देवेंद्र ईसापुर प्रा. नीरज अतकरी सर तसेच महाविद्यालयाचे कर्मचारी पुकराज लांजेवार , सय्यद सय्यद रवी मुंगलमारे, वनिता देशमुख रश्मी देशमुख तसेच महाविद्यालयाचे सर्व छात्रध्यापक व छात्रध्यापिका यांनी विशेष सहयोग दिले.