एन.जागतिक मानवाधिकार संघटन भारत अंतर्गत,”विदर्भ प्रदेश,पदाधिकाऱ्यांच्या पदाला मंजूरी..

निलय झोडे

 उपसंपादक

      एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पांडूरंग नरवडे आणि राष्ट्रीय महासचिव बुधराव कोटनाके यांच्या मार्गदर्शनाखाली,तद्वतच महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या योग्य सुचनांन्वये व देखरेखीखाली महाराष्ट्र राज्यात एन.जागतिक मानवाधिकार संघटनेची बांधणी सुरू आहे.

       याच अनुषंगाने,”विदर्भ प्रदेश कार्यकारणी अंतर्गत ४ पदाधिकाऱ्यांच्या पदाला मान्यता देणे संबंधाने महाराष्ट्र राज्य पदाधिकारी,कुमार संजय टेंभुर्णे,श्री.निलय झोडे,श्री.शेखर ईशापुरे,श्री.ऋग्वेद येवले,यांनी विनंती अन्वये सुचना केली होती.

       त्यांच्या सुचनेला अनुसरून,”विदर्भ प्रदेश कार्यकारणी अंतर्गत पदाधिकाऱ्यांच्या चार पदाला,आज दिनांक १२/०५/२०२४,रोज रविवारला महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रदीप रामटेके यांच्या द्वारा मान्यता देण्यात आली आहे.

***

   — यानुसार खालीलप्रमाणे,”विदर्भ प्रदेश, पदाधिकारी ….

१) श्री.प्रेमानंद आनंदराव हटवार,:- विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष..
२) श्री.प्रदीप गोविंदराव ढबाले :- विदर्भ प्रदेश सचिव… 
३) श्री.संजयकुमार केवळराम झिंगरे :- विदर्भ प्रदेश सहसंघटक..
४) श्री.लेहेंद्र कुंडलीक गेडाम :- विदर्भ प्रदेश सहसंघटक…

***

            एन.जागतिक मानवाधिकार संघटनेचे वरील सर्व नवनियुक्त विदर्भ प्रदेश पदाधिकारी हे सामाजिक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती असून ते सर्व पदाधिकारी आपल्या कार्यक्षेत्रातंर्गत नागरिकांच्या हितासाठी कर्तव्य पार पाडतील अशी अपेक्षा,महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा मध्यमा मनिष सवाई,महाराष्ट्र राज्य संघटक दिलीप तांदळे,महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे,महाराष्ट्र राज्य सल्लागार दर्शना मेश्राम,विदर्भ प्रदेश अध्यक्षा प्रतीभा अनील खोब्रागडे,विदर्भ प्रदेश सरचिटणीस पल्लवी बागडे-चहांदे यांनी केली आहे.