छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय, आसेगांव पूर्णा येथे एड्स जागृति कार्यक्रम, अंतराष्ट्रीय युवा दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती निमित्य माहिती साक्षरता कार्यशाळा संपन्न.

 

युवराज डोंगरे/खल्लार

स्थानिक छत्रपती शिवाजी कला महाविद्यालय येथे दिनांक १२ ऑगस्ट २०२३ ला महाराष्ट्र शासन आरोग्य विभागातर्फे रेड रिबन क्लब ग्रामीण रुग्णालय चांदुर बाजार ऑनलाइन एड्स जन-जागृति कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास महाविद्यालयाचे व राष्ट्रसंत गुरुकुल आश्रमशाळा चे विद्यार्थी व शिक्षकवृंद बहूसंखेने उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय सेवा योजना तर्फे अंतर्राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. डॉ सियाली रामामृत रंगनाथन भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक यांच्या जयंती निमित्य ग्रंथालय विभागातर्फे ‘माहिती साक्षरता ‘ ह्या विषयावर एकदिवसीय कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ता प्रा. विपिन लिल्हारे यांनी ग्रंथालय परिचय, ग्रंथालय कार्यपद्धती, पुस्तक व माहिती चे महत्व, माहिती ची उपलब्धता व विविध माहिती स्त्रोत यावर पीपीटी द्वारा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. आशीष काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रविन्द्र इचे यांनी केले. टेक्निकल पर्सन म्हणून डॉ. हरीश काळे यांनी काम पाहीले तर या कार्यक्रमास डॉ. प्रविण सदार व संजय सोळंके उपस्थित होते. तिन्ही कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्र. प्राचार्य डॉ. भारत कल्याणकर यांनी भुषवले.