गृहअर्थशास्त्र विभागाकडून शरबत प्रशिक्षणाचे आयोजन…

     रामदास ठूसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि

चिमूर :- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाकडून शरबत प्राशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

         या प्रसंगी गृहअर्थशास्त्र विभागाच्या मुलीना १० प्रकाराच्या शरबत बनविण्याचे प्राशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण शिवप्रसाद जयस्वाल, अर्जुनी मोरगाव येथील गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ मिनाक्षी तडस यांनी दिले. सोबतच प्रात्याक्षिके करून दाखविली. विविध शरबत निर्मितीतून रोजगार निर्माण करावा असे मार्गदर्शन सुध्दा त्यांनी केले.

         या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल होते. तसेच उपप्राचार्य डॉ.प्रफुल्ल बन्सोड प्रा.डॉ.कार्तिक पाटील प्रा आशुतोष पोपटे हे उपास्थित होते.

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन गृहअर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.शितल वानखेडे यांनी केले. सूत्रसंचालन कु.नंदीनी पोपटे व आभार कु.विशाखा दांडेकर हिने केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यानी उदंड प्रतिसाद दिला.