राजश्री शाहू महाराज आखाडा उपराई येथे महात्मा ज्योतिराव फुले व बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संयुक्त साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

          उपसंपादक

खल्लार नजिकच्या उपराई येथिल बु.रामरावजी खंडारे बहूउद्देशिय समाज विकास संस्थेद्वारा संचालित असलेल्या राजश्री शाहू महाराज आखाड्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्तिक जयंती साजरी करण्यात आली.

           संस्था अध्यक्ष राहुल एस.खंडारे यांनी दिपप्रज्वलन करुन प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले .त्यावेळी कार्यक्रमाला लाभलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक गंफाजी संभाजी खंडारे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.

           त्याचप्रमाने डि.वाय.खंडारे यांनी सुद्धा पुष्प अर्पण केले.संस्था अध्यक्ष यांनी विश्वभुषण,भारतरत्न, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर व कार्याचा उलगडा केला.

           मला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय शिकवणारा धर्म आवडतो.महिलांनी ज्या प्रमाणात प्रगती केली आहे त्यावरून मी समाजाची प्रगती मोजतो.जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत.बुद्धीमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे.जो प्राषण करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. बाबासाहेबांच्या विचारावर संस्थाध्यक्ष यांनी विश्लेषणात्मक मार्गदर्शन केले.

            तसेच सर्व प्राण्यांमध्ये पुरुष सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्व मानवांमध्ये स्त्री सर्वश्रेष्ठ आहे.स्त्री आणि पुरुष जन्मतःच मुक्त आहेत,त्यामुळे दोघांनाही सर्व हक्क समानतेने उपभोगण्याची संधी मिळाली पाहिजे. 

महात्मा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकते वेळी ते म्हणतात,

विद्येविना मती गेली!

मती विना निती गेली!

निती विना गती गेली!

गती विना वित्त गेले!

वित्त विना शुद्र खचले!

एवढे अनर्थ एका अविद्येने केले!

        वरील उक्ती प्रत्येकाने समजुन घेणे फार महत्त्वाचे ठरते. असे मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सर्व पदाधिकारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सर्वांना मिठाईचा वाटप करण्यात आला. शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन भूषण खंडारे यांनी केले.