कलियुगामध्ये तुमच्या आमच्या करिता भगवान पंढरीनाथ परमात्मा हेच सुखाचे स्वरूप आहे,तर भगवंताच्या सोबत व संगत आसण हेच खरे सुख आहे.:-श्री गुरु महेश महाराज देहुकर यांचे उद्गार

नीरा नरसिंहपुर दिनांक: 14

प्रतिनिधी:- बाळासाहेब सुतार ,

टणु तालुका इंदापूर येथील भर्तरीनाथ ग्रामदैवताच्या प्रांगणात सालाबाद प्रमाणे श्री तुकोबाराय गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

पंढरपूर येथील तुकाराम महाराजांचे वंशज श्री गुरु डॉक्टर महेश महाराज देहुकर यांची काल्याच्या कीर्तनाची शेवा झाली.किर्तन शेवे प्रसंगी सांगत आसताना श्री गुरु डॉक्टर महेश महाराज देहुकर म्हणाले की,,परमार्थिक सुख प्राप्त करायचे असेल तर मनो भावाने धार्मिक सेवा करावी.

संसारात येऊन धन्यव करायचे आसेल तर महाराजांनी सोपा मार्ग दाखविलेला आहे.तुका म्हणे संसाराची प्राप्ती हरी रंग रंगोनी सर्व भावे भक्ती करण्याच्या मागे सुख आहे.महेश महाराज यांचे या वेळी उद्गार

भरतरी नाथाच्या पावन भूमीमध्ये टणु गावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा सालाबाद प्रमाणे गुरुवार दिनांक 6 /4 /2023 ते गुरुवार दिनांक 13 /4/ 2023 चालू होता 24 व्या वर्षाला प्रारंभ झाल्याने सर्वच भाविक भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या सर्व भाविक भक्त व ग्रामस्थांसाठी संपूर्ण आन्नदान सेवा ही टणु ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात करण्यात आली.काल्याच्या कीर्तनाला आलेल्या सर्व भाविक भक्तांना श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

  ग्राम पंचायत टणु विद्यमान सरपंच, उपसरपंच,आजी माजी सरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हायच चेअरमन व सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ टणु यांच्या संयुक्त विद्यमाने हा अखंड हरिनाम सोहळा आठ दिवस शेवट पर्यंत नामाच्या जयघोषात पार पाडण्यात आला. हाजारो भाविक भक्तानी सप्ताहाच्या सोहळ्यामध्ये 

काल्याच्या कीर्तनाचा लाभ घेतला.

या परिसरातील गिरवी, ओझरे, संगम, बाभुळगाव, नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, बावडा, भांडगाव, गारआकोले, टाकळी ,टणु , गोंदी, बिजवडी,आकलुज,बोरगाव,वाघोली, येथील सर्व ग्रामस्थ, भाविक भक्त, तसेच विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, व भाविक हरिनाम सप्ताहासाठी काल्याच्या कीर्तनास मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शेवटी महाप्रसाद घेऊन काल्याच्या किर्तनाची सांगता झाली.