पत्नी सोबत पतीचे भांडण आणि रागाच्या भरात घराला लावली आग.. — पतीने उघड्यावर आणला संसार..

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

पारशिवनी:- 

      पारशिवनी तालुकातंर्गत मौजा सकरला येथील सौ.ममता शुभम राऊत व पती शुभम राऊत यांच्या मध्ये शेतात कडाक्याचे भांडण झाले.भांडण झाल्यावर शुभम राऊत यांनी गाव गाठत रागाच्या भरात स्वतःच्या घराला आग लावली.यामुळे घर आगीत भस्मसात झाले असल्याची दुःखदायक घटना घडली.

          या घटने नंतर शुभंमची पत्नी सौ.ममता राऊत यांनी पारशिवनी पोलिस स्टेशनला घर जाळल्याची तक्रार दाखल केली.अ.क्र.१२३/२३,अन्वये भांदवी कलम ४३६ अंतर्गत शुभंम राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करीत आहेत.

          अग्नी मध्ये जळलेल्या घराचे अंदाजे १ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे पुढे आले आहे.