नंदलाल पाटील कापगते विद्यालय साकोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

      साकोली -नंदलाल पाटील कागदाचे विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय साकोली येथे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्रासंग करेल तो गुदगुल्याशिवाय राहणार नाही अशी सिंहगर्जना करणारे विश्ववंदनीय महामानव युगपुरुष युगप्रवर्तक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डी एस बोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.के.जी.लोथे सर ,प्रा.एन.पी.बावनकर सर, प्रा.स्वाती गहाणे मॅडम, प्रा.बी.पी बोरकर सर, एम. टी.कोचे सर, सी.जी.झोडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते. 

        कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. 

          प्रमुख अतिथी एम.टी.कोचे सर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे खडतर जीवन जगत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून शिक्षणाला किती महत्त्व आहे, शिक्षणाने माणूस समृद्ध होतो, माणसाचे विचार समृद्ध होतात, शिक्षण हे समाजात बदल घडविण्याचे प्रभावी शस्त्र होऊ शकते. शिक्षण माणसाला कर्तव्य आणि हक्काची जाणीव करून देतो ,इतरांप्रती आदर ,विनयभाव आणि क्षमाभाव हे गुण प्रत्येकांच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची अत्यंत गरज आहे “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूळमंत्र देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले असे मौलिक विचार सरांनी ठेवले आहे. 

        याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित गीत, भाषणे सादर केलेत.

         कार्यक्रमाच्या संचालन आर. व्ही. दिघोरे सर तर आभार प्रदर्शन सौ एस वाय क-हाडे यांनी केले.

        कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता विद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .