नवजीवन सीबीएसई मध्ये भीमगीतांचे आयोजन.

नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

        साकोली -नवजीवन कॉन्व्हेंट एंड इंग्लिश प्राय. स्कुल (सीबीएसई) साकोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त नवजीवन (सीबीएसई) चे विद्यार्थी तसेच शिक्षकवृंदांनी भीमगीते सादर करून अभिवादन केले. या कार्यक्रमाप्रंसगी अध्यक्ष प्राचार्य मुजम्मिल सय्यद, पर्यवेक्षिका शर्मिला कछवाह, वरिष्ठ शिक्षिका भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी विनोद किरपान उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, द्विपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली.

       भारतरत्न, दीन दुबळ्यांचे व शोषितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध बाबासाहेबांच्या जीवनावर आधारीत भीमगीते सादर करण्यात आली. महामानवाला भीमगीतांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मुज्जमिल सय्यद यांनी महामानवाच्या जन्म दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांचे आदर्श व विचार आत्मसात करून देशाच्या विकासासाठी व भवितव्यासाठी प्रयत्नशिल बनावे असे आव्हान केले. सरताज साखरे, जयंत सर, वंदना घोडीचोर, सुनिता बडोले व जनबंधुबाई यांनी बाबासाहेबांच्या जिवनावर आधारीत भिमगीते सादर करून या महामानवाला वंदना दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिक्षकगण व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बहुमोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन सोनाली पारधी व आभार वंदना थोडीचोर यांनी केले.