कोजबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

      आरमोरी:- आरमोरी तालुक्यातील कोजबी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम महाकारूणीक तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

         त्यानंतर ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात आले. ध्वजारोहणाचे कार्यक्रम गिरीधर चाहांदे, सुखदेव बोदेले, चिंतामण साहारे , गुलाब ताडाम यांच्या हस्ते तर, रामकृष्ण गेडाम, भगवान मोहिते , देवेंद्र बोदेले , विजय जनबंधू, नानाजी बोदेले, दिनेश जी बनकर ,विनोद जी मानकर , सौ. माधुरी सहारे पोलीस पाटील, सौ कविता ताडाम सरपंच ग्रामपंचायत कोजबी, प्रवीण चहांदे उपसरपंच, पूनम बोदेले ग्रामपंचायत सदस्य, कुमरे मॅडम , पाटील मॅडम , मनोहर जी मोरांडे ग्रामपंचायत सदस्य, ईश्वरजी मेश्राम, अश्विन बोदेले, केवळराम नंदेश्वर, कुसुम बोदेले, प्रज्ञा राहटे, मंदाबाई बोदेले, मुक्ताबाई मेश्राम, यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले.

 याप्रसंगी ध्वजारोहणानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी गावातील , समाजातील महिला, पुरुष, तरुण, युवक, युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्या कार्यक्रमाचे संचालन मिथुन नंदेश्वर, सदाशिव शेंडे, अश्विन बोदेले यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य केले. सायंकाळी साडेचार वाजता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.