स्वराज्य फाउंडेशन आलापल्लीच्या प्रयत्नाने अपघातग्रस्तांना मिळाली तात्काळ मदत…. — हाक तुमची साथ आमची…

रमेश बामणकर 

अहेरी तालुका प्रतिनिधी 

गुड्डीगुडम :-भामरागड तालुक्यातील येचली येथील रहिवासी राजना येरावार वय ४५,सुरेश सरमपल्लीवर वय ५० व सत्यनारायण कुंदमवार वय ४५ हे इसम आज १२ मे रोजी आपल्या वैयक्तीक कामानिमित्त आलापल्ली येथे आले होते आपले काम आटोपून आपल्या घरी येचली(भामरागड) येथे दुचाकीने जायला निघाले होते आलापल्ली वरून काही अंतरावरच विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

          त्यात सुरेश सरमपल्लीवर हे गंभीर जखमी झाले तर इतर दोघानाही गंभीर दुखापत झाले तिथून येणाऱ्या जाणाऱ्या पैकी एका ने स्वराज्य फाउंडेशनच्या पदाधिकारी यांना संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता क्षणाचा विलंब ही न करता स्वराज्य फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी लगेच स्वराज्य फाउंडेशनची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले व अपघातग्रस्तांना आलापल्ली येथील डॉक्टर सलूजा ह्यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार घेऊन त्यांना पुढील उपचाराकरिता गडचिरोली येथे पाठविण्यात आले.स्वराज्य फाउंडेशन चे या सेवाभावी कार्यामुळे फाउंडेशनचे व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करीत करीत आहेत.