जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी च्या वर्ग 10वी आणि वर्ग 12वी च्या CBSE परीक्षेचा 100% निकाल.

कमलसिंह यादव 

   प्रतिनिधी

  पारशिवनी :- जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी पारशिवनी (नागपूर) चा वर्ग दहावी व वर्ग बारावीच्या परीक्षेचा १०० टक्के निकाल लागला आहे.  

        इयत्ता 10 वी मध्ये कुमारी मोहिनी माने 99.३०% मिळवून प्रथम आली. मोहिनी माने हिने हिंदी, गणित आणि सामाजिक शास्त्र या तीन विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवले. 10 विद्यार्थ्यांना मराठी विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. एका विद्यार्थ्याने सामाजिक शास्त्रात १००%, गणितात दोन व हिंदीत १००% गुण मिळवून शाळेचे नाव उंचावले आहे.

         मिस साक्षी घैर 93.८०% गुण मिळवून 12वी मध्ये पहिली आली. डॉ. जरीना कुरेशी, मुख्याध्यापिका जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी नागपूर यांनी उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन व आभार मानले. यासोबतच प्राचार्य जरिना कुरेशी मॅडम व शिक्षक शिक्षिका कर्मचारी शिक्षकांनी इयत्ता 10 वी व 12 वी च्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.