रुग्णांच्या सेवेत अविरत झटणाऱ्या सिरोंचाचे परिचारिकांचा मूलकला फाऊंडेशन कडून गौरव सत्कार.

डॉ.जगदीश वेन्नम

    संपादक

सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांच्या सेवेसाठी परिचारिका माता-भगिनींनी दिवस – रात्र ग्रामीण रुग्णालयात तसेच ग्रामीण भागात सेवा कामे करत असतात.

           कोरोना काळात रुगांच्या सेवेत उत्कृष्ट प्रेरणादायी कामे परिचारिका माता-भगिनींनी केली आहे.

       त्यामुळेच आज कोरोना महामारी संकट पासून आपण यशस्वी झालो आहे.

         सिरोंचा तालुक्यातील अनेक गोर गरिबांचे जीव वाचवण्यासाठी आरोग्य विषयावर परिचारिका माता – भगिनींनी उत्कृष्ट काम केली आहे.

           आज १२ मे रोजी जागतिक परिचारिका दिना निमित्ताने सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या मूलकला मदत फाऊंडेशनकडून सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातिल सर्व परिचारिका माता- भगिनींना पुष्पगुच्छ, शाल,श्रीफळ देऊन फाउंडेशनचे अध्यक्ष – सागर भाऊ मूलकला यांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

       त्यावेळी सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन वालके, मूलकला फाऊंडेशनचे कार्यकर्ते – राजू मूलकला, स्वामीराज मूलकला, उदय मूलकला, कल्याण मूलकला, राजम मूलकला,यांची उपस्थिती होते.