डॉ.जगदीश वेन्नम
संपादक
रमेश बामणकर
अहेरी तालुका प्रतिनिधी
भामरागड:- तालुक्यातील ताडगाव येथे ‘शासन आपल्या दारी’ अभियान अंतर्गत महाराजस्व अभियान शिबीर घेण्यात आले.या शिबिराचे उदघाटन अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भामरागडचे प्रभारी तहसीलदार अनमोल कांबळे,प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,नायब तहसीलदार तथा मुख्याधिकारी प्रकाश पुप्पलवार,गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम,आदी मान्यवर उपस्थित होते.
महसूल प्रशासनाकडून भामरागड तालुक्यात एकूण 5 ठिकाणी महाराजस्व अभियान शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.जिंजगाव,नेलगुंडा,लाहेरी नंतर 4 थे महाराजस्व अभियान शिबीर ताडगाव येथे घेण्यात आले.या शिबिरात विविध विभागाकडून स्टॉल लावून उपस्थित नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.तसेच विविध विभागाकडून दाखले व प्रमानपत्रांचे वाटप करण्यात आले.
ताडगाव येथील शिबिरासाठी तहसीलदार अनमोल कांबळे यांच्या नेतृत्वात मागील दोन दिवसांपासून तयारी करण्यात आली.या शिबिरात ताडगाव,पल्ली,केहकापरी,दुडेपल्ली,पोकुर,कोडपे, कुचेर,मुत्तेनकुही, मर्दहुर,कोस्फुंडी,कुडकेली,केडमारा,व टेली,बोटनफुंडी,टेकला,वीसामुंडी,गुंडापुरी,तिरकामेटा, फुंडी आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.